how to develop personal development ?

तुमच्या इच्छाशक्तीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी हे करा 

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपल्या अनुकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्याकडे प्रबळ राहण्यास प्रचंड इच्छाशक्ती असावी लागते. त्यासाठी आपल्या मनाची सुद्धा तयारी खूप असावी लागते. इच्छाशक्ती असेल तर तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रसंगात खंबीर पणे उभे राहू शकता. त्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारे आपल्या मनाची तयारी करू शकता याची माहिती घेऊया ….

कुणाचेही यश आणि अपयश ह्याच्या मागे नशिबापेक्षा त्याच्या कामाचा जास्त हात असतो. आपले काम , वैयक्तिक आयुष्य ,शारिरीक आरोग्य, आर्थिक परिस्थिती या सगळ्यांचा विचार करत यश मिळवायचे हा सर्वात मोठा प्रश्न असतो. सगळ्यांच्या पुढे राहून जर मोठे व्हायचे असेल तर त्यासाठी तेवढे कष्ट मनाची तयारी असणे जास्त गरजचे आहे. कोणाचेही यश आणि अपयश या पाठीमागे त्याचे नशीब हे जास्त महत्वाचे नसते. त्याच्याबरोबर त्याच्या कामाचे महत्व हे खूप जास्त असते. त्यासाठी कसे करणे अपेक्षित आहे .

तुम्ही तुमच्या मनाशी पहिले ठरवा —

अनेकांना आपल्याला ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्यात जास्त लक्ष लागत नाही. किंवा करण्यापूर्वीच खूप सारी कारणे आपल्या आजूबाजूला तयार असतात. त्यामुळे मनाची चांगल्या प्रकारे तयारी करून तुम्ही तुमचे निर्णय घायला शिका. मनात ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टींना सकारात्मक दृष्टीने पाहायला सुरुवात करा. जी गोष्ट करायची ठरवली आहे. त्या गोष्टींसाठी वेळ द्या.

नियोजन व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा —-

कोणत्याही गोष्टींमध्ये उतरण्यापूर्वी आपल्या कामाचे नियोजन हे खूप चांगल्या रीतीने असले पाहिजे. नियोजन हे जर स्ट्रॉंग असेल तर मात्र आपल्याला कोणत्याही गोष्टीचे टेन्शन हे अजिबात राहत नाही. अगदी लहानातील लहान गोष्टींचे नियोजन जास्त प्रभावीपणे काम करू शकते. सुसंगत पद्धतीने नियोजन हे आपल्या प्रत्येक कामाला अजून प्रभावी ठेवण्याचे काम करते.

नोंद करून ठेवा —-

आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत. त्या गोष्टींबाबत आपल्याला माहिती असणे जास्त गरजचे आहे. म्हणजे त्या दिशेनं आपल्याला वाटचाल करता येऊ शकते. आपल्या दिनचर्येबरोबर आपल्या व्यायामाचे पण नियोजन असणे गरजेचे आहे. आपले फक्त नियोजन हे चांगले असणे गरजेचे नाही तर त्याच्यासोबत त्याची अंबलबजावणी सुद्धा असणे गरजेचे आहे. अंबलबजावणी जर व्यवस्थित केली तर तुम्हाला यशाची शिखरे गाठायला वेळ लागत नाही.

मानसिक तयारी ठेवा —-

कोणत्याही गोष्टीत यश मिळवण्यासाठी सगळ्यात महत्वाची असते ती एकाग्रता. कोणतेही काम करताना, त्याची योजना बनवताना आपले मन जेवढे एकाग्र असेल तेवढेच त्या कामात आपली पूर्ण शारीरिक आणि मानसिक ताकद लागते आणि त्या कामात आपल्याला यश मिळण्याची शक्यता वाढते.मात्र आपले मन एकाग्र होण्यासाठी आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ चांगले असणे फार गरजेचे असते. जर आपण आजारी असू तर अशावेळी आपले मन आपल्याला हवे तसे काम करणार नाही आणि आपण आपले धेय्य प्राप्त करू शकणार नाही. त्यासाठी पुरेशी झोप आणि सकस आहार या सगळ्या गोष्टींबाबत आपले नियोजन सुद्धा काटेकोर असले पाहिजे.