|

थंडीच्या दिवसांत आपण आपल्या मुलांची काळजी कशी घ्यावी ?

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । हिवाळ्याच्या दिवसांत सगळीकडे वातावरण फार थंडीचे असते. थंडीच्या दिवसांत मुलांची काळजी घ्यायची असेल तर आई वडिलांनी आपल्या मुलांना खूप काळजी घ्यावी लागते. थंडीच्या दिवसांत मुलांना सर्दी , खोकला , ताप अश्या समस्यांना सामोरे जावे लागते. सर्दी खोकला असेल तर मुलांच्या नाकपुड्या या बंद होतात. त्यांना श्वास घेण्याचा त्रास हा निर्माण होऊ शकतात. अश्या वेळेस मुलांना बचावासाठी नेहमी गरम पाण्याची वाफ दिली जाते. पण त्या वाफेमुळे मुलांच्या नाजूक त्वचेला सुद्धा त्रास निर्माण होतो. त्यामुळे मुलांच्या रक्तप्रवाहामध्ये नुकसान पोहचु शकते. त्यामुळे मुलांची काळजी घेताना आई वडिलांनी कोणती काळजी घ्यावी याबद्धल माहिती घेऊयात …

 हिवाळ्याच्या दिवसांत  जर मुलांना  श्वास घेण्याचा त्रास हा  होण्याचा असेल तर   त्यावेळी मुलांना आईचे दूध  पिण्यास  त्रास होऊ 
शकतो. एका वर्षापेक्षा लहान मुले जी असतात. त्यांना वायरल इन्फेकशन  पेक्षा बॅक्टरील इन्फेकशन  मुळे जास्त असते. सहा ते आठ 
महिन्याच्या मुलांच्या छाती संबंधित तक्रारींपासून बचावासाठी आईचे दूध सर्वोत्तम आहे. अश्या वेळी आई  खूप महत्वाचे असते.  पण  
गाईचे,  म्हशीचे दूध दिले जाऊ  नये.  अश्या वेळेस बाटलीने अजिबात   दूध पाजले जाऊ नये. त्यामुळे मुलांना  ठसका  लागू शकतो.  त्यामुळे लहान  मुलांचा श्वास  हा कोंडला जाऊ  शकतो.  तसेच त्यांना डायरिया किंवा न्यूमोनिया अश्या आजारांना  सामोरे जावे   लागू शकते. 


   लहान बाळांना कोणत्याही पद्धतीचे बाटलीतून दूध देताना उकळलेल्या आणि स्वच्छ बाटलीतून दूध देण्याची काळजी हि आई वडिलांनी  घेतली गेली पाहिजे. अनेक  वेळा  आपण बाळाला दूध  दिल्यानंतर  बाटली चांगल्या प्रकारे उकळल्यानंतर साफ करावी.कारण बाटलीच्या आतील भाग चिकटलेल्या केमिकलने इम्पून सिस्टीमला नुकसान पोहोचू शकते. जर जास्त दिवस बाटली  न धुता वापरली तर त्यापासून मुलांना धोका निर्माण होऊ शकतो. हिवाळ्याच्या दिवसांत मुलांना थंडी , ताप हा जास्त वाढतो. त्या वेळेस मुलांना शेकोटी देऊन झोपी घालावे. 


  थंडीच्या दिवसांत मुलांना थंड पेये आणि डब्बा बंद ज्यूस पिण्यास देऊ नये. कारण अश्या हवाबंद डब्यामध्ये  ठेवलेले ज्यूस हे  बराच काळ बनवला   गेलेला असतो.  त्यामुळे लहान  मुलांना  कोणत्याही  बाहेरचे  पदार्थ हे मुलांना दिले जाऊ नये.बाहेरची  फळे आणि  ताजी असलेली फळेच त्यांना त्यांच्या आहारात दिली जावीत. थंडीचा सर्वात परिणाम त्वचेवर होतो. म्हणूनच या दिवसात खाज आणि 
त्वचेच्या पापुद्र्यांपासून बचावासाठी स्नानानंतर योग्य प्रमाणात लोशन आणि खोबरेल तेल लावावे. थंडीत मुलांची त्वचा हि जास्त कोरडी पडते. त्यामुळे कोमल  त्वचेला जास्त त्रास होणार नाही अश्या प्रकारच्या लोशन चा वापर करावा.