केवळ एक कप चहा करेल पावसाळी आजारांची सुट्टी; कसे ते जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। चहा हे पेय अत्यंत उत्साह देणारे आहे. त्यामुळे दमून भागून आल्यावर चहा हवाच. विशेष करून पावसात तर कडकडीत चहाला अन्य पर्यायच नाही मूळी. मात्र पावसाळा येताना आनंदासोबत आजार देखील घेऊन येतो. अश्यावेळी या आजारांशी दोन हात करायला जर चहाची साथ मिळाली तर..? होय.. आता चहाच्या माध्यमातून पावसाळी आजारांपासून सुटका मिळवता येईल. फक्त हा चहा दुधाचा नसून हिरव्या चहा पातीचा असावा किंवा मग ग्रीन टीपेक्षा जास्त सोप्पे ते काय..? फक्त यासोबत आणखी कोणते पदार्थ मिसळल्याने फायदा होऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी पूर्ण लेख वाचा.
गवती चहामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे अनेक घटक असतात ज्यामुळे गवती चहाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. गवती चहाचे सेवन कर्करोगावर शिवाय गवती चहामध्ये ताज्या आल्याचा आणि साखरेऐवजी गुळाचा वापर केल्यास वजन नियंत्रित राहते,शरीरास उष्णता मिळते आणि मुख्य म्हणजे कर्करोगाने होणाऱ्या त्रासापासून आराम मिळतो. फक्त हा चहा दुधाशिवाय प्यावा. तसेच सर्दी, पडसे, खोकला यांसारख्या पावसाळी आजारांवरदेखील आराम मिळतो.
चहामध्ये गुळाचा वापर केल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते व मधुमेह प्रकार २ चा धोका टळतो. तर ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सीडेन्ट असतात. जे हृदयरोग व मधुमेहाच्या आजारांवर आणीबाणीच्या प्रसंगात मुख्य भूमिका बजावतात. मात्र ग्रीन टी सोबत लिंबाच्या रसाचे सेवन शरीरातील मेद जाळण्यास आणि पावसाळी आजारांवर आराम देण्यास फायदेशीर ठरते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार असा चहा १२ आठवडे नियमित प्यायला तर वजन कमी होते व अत्यावश्यक चरबी नाहीशी होते.
विशेष करून पावसाळ्यामध्ये बॅक्टेरिया जास्त प्रभावी असतो. ज्यामुळे लहान मुलांना लगेचच सर्दी, पडसे आणि फ्ल्यू सारखे आजार होतात. इतकेच नव्हे तर पावसात अधिक भिजल्याने निमोनिआ होण्याची शंकाही बळावते. यावर गवती चहा आणि आलं यांसोबत ग्रीन टी आणि लिंबू अधिक फायदेशीर आहे. कारण शरीरात ओलावा टिकून राहाण्यासाठी लिंबू मिसळलेला ग्रीन टी मदत करतो.
शरीरातील प्रत्येक अवयवासाठी आजारादरम्यान ओलसरपणा महत्त्वाचा असतो. विशेषत: त्वचा ओलसर राखण्यासाठी, वजन नियंत्रित करण्यासाठी, मेंदूचे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी, पचनसंस्थेचे कार्य सुरक्षित राखण्यासाठी आणि किडनीचे काम सुरळीत होण्यासाठी शरीरात ओलावा राहणे गरजेचे असते. हा ओलावा लिंबू टाकून ग्रीन टी किंवा साध्या चहात लिंबू पिळून प्यायल्यानेदेखील आराम मिळतो. याचसोबत किडनी स्टोन, डोकेदुखी, बध्दकोष्ठता या समस्यांपासूनही सुटका होते.