7 Day Healthy Meal Plan: हेल्दी रहायचंय..? तर हेल्दी डाएट करा ना; जाणून घ्या आठवड्याचा मिल प्लॅन
हॅलो आरोग्य ऑनलाईन। 7 Day Healthy Meal Plan उफफ्फ… एकवेळ आरोग्याची वाट लावणं सोप्प आहे पण आरोग्य जपणं.. बापरे ! असं तुमच्यापैकी किमान १० जणांना तरी वाटतच असेल यात काही शंकाच नाही. कितीतरी लोक अशी असतील ज्यांना आरोग्याची काळजी घेणे म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखं वाटत असेल. पण मित्रांनो, आरोग्य सांभाळले नाहीत तर स्वस्थ कसे जगाल..? तुम्हाला काय वाटत तुमचा लाडका हिरो किंवा हिरोईन असेच इतके फिट आणि फाईन दिसतात का..? कॅटरिना..करीना..प्रियांका.. क्रिती सॅनॉन जितक्या दिसायला सुंदर तितक्याच शारीरिकरित्या फिट आहेत. दुसरीकडे आपण..? थोडे इथून सुटलोय थोडे तिथून..
तज्ञ सांगतात कि, आपण जे काही खातो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. आता रोजची जीवनशैली पाहता योग्य आणि पूर्ण आहार घेणारे फार कमी लोक आहेत. (7 Day Healthy Meal Plan) यामुळे संपूर्ण दिवस काम करून थकेलेलं शरीर अपूर्ण आहारामुळे विकसित होत नाही. शिवाय शरीरात ऊर्जा पुरेशी न साचल्याने अंगातील त्राण निघून जातात. परिणामी पोटाच्या समस्या, वजन वाढणे अन्य गंभीर त्रास होऊ लागतात. मग डॉक्टरांच्या वाऱ्या आणि गोळ्या औषधांमध्येच आयुष्य संपू लागते. त्यामुळे जर तुम्हाला असे जीवन जगायचे नसेल तर वेळीच सावध व्हा!
उत्तम जीवनशैलीसह उत्तम आहार आणि विहार आपले आरोग्य कसे असणार हे ठरवीत असतो. त्यामुळे आहार योग्य, पूर्ण, सकस आणि पौष्टिक असायलाच हवा. यासाठी आहार तज्ञांनी आठवड्याचा आहार (Weekly Meal Plan) ठरवलेला आहे. यात कधी काय खायचं आणि किती खायचं हे सांगितलं आहे. चला तर हेल्दी डाएट प्लॅन जाणून घेऊ आणि निरोगी जगण्याचा आरंभ करू.
० 7 दिवसांसाठी निरोगी डाएट प्लॅन
(7 Day Healthy Meal Plan)
दिवस पहिला
सकाळी उठल्यावर –
१ ग्लास लिंबू मिसळून कोमट पाणी.
नाश्ता –
१ एग (Egg) टोस्ट, १ कप ब्लू बेरी
दुपारचे जेवण –
१ कप काळ्या घेवड्याचे सूप
संध्याकाळचा नाश्ता –
१ मध्यम संत्र्याचे ज्यूस
रात्रीचे जेवण –
१ तुकडा सॅल्मन मासा, १ कप वाफवलेले हिरवे बीन्स, 1 भाजलेलं रताळं. फॅट फ्री ग्रीक दही आणि चिमूटभर मिरपूड.
दैनिक एकूण: 1,224 कॅलरीज, 60 ग्रॅम प्रथिने, 142 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 28 ग्रॅम फायबर, 52 ग्रॅम चरबी, 11 ग्रॅम सॅट. चरबी., 828 मिलीग्राम सोडियम
दिवस दुसरा
सकाळी उठल्यावर –
१ ग्लास लिंबू मिसळून कोमट पाणी. (7 Day Healthy Meal Plan)
नाश्ता –
१ कप मिक्स ओट्स, १ मध्यम सफरचंद
दुपारचे जेवण –
१ कप पालक सूप आणि स्ट्रॉबेरी मील-प्रेप सॅलड
संध्याकाळचा नाश्ता –
१ कप फ्रुट सॅलड
रात्रीचे जेवण –
१ कप कोळंबी आणि गाजराचे सूप
दैनिक एकूण: 1,225 कॅलरीज, 75 ग्रॅम प्रथिने, 148 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 39 ग्रॅम फायबर, 50 ग्रॅम चरबी, 9 ग्रॅम सॅट. चरबी., 1,363 मिलीग्राम सोडियम
दिवस तिसरा
सकाळी उठल्यावर –
१ ग्लास लिंबू मिसळून कोमट पाणी.
नाश्ता –
१ कप नॉनफॅट दही, १ कप ब्लूबेरी, १ मूठ बदाम – ओट्स आणि २ टीस्पून. मध
दुपारचे जेवण –
१ कप पालक गाजर सूप आणि मिक्स फ्रुट सॅलड
संध्याकाळचा नाश्ता –
१ मध्यम संत्र्याचे ज्यूस (7 Day Healthy Meal Plan)
रात्रीचे जेवण –
१ कप रताळे आणि शेंगदाणा सूप, १ स्लाईस व्होल व्हीट टोस्ट ब्रेड (गव्हाचा ब्रेड)
दैनिक एकूण: 1,212 कॅलरीज, 70 ग्रॅम प्रथिने, 132 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 30 ग्रॅम फायबर, 51 ग्रॅम चरबी, 9 ग्रॅम सॅट. चरबी., 1,332 मिलीग्राम सोडियम
दिवस चौथा
सकाळी उठल्यावर –
१ ग्लास लिंबू मिसळून कोमट पाणी. (7 Day Healthy Meal Plan)
नाश्ता –
१ कप मिश्र धान्यांचे सूप, १/२ कप ब्लूबेरी, १ मध्यम सफरचंद
दुपारचे जेवण –
१ कप गाजर पालक सूप
संध्याकाळचा नाश्ता –
१ कप मिक्स फ्रुट आणि सुका मेवा
रात्रीचे जेवण –
३/४ कप शिजवलेला ब्राऊन राईस , १ कप वाफवलेले बीन्स, ब्रोकोली आणि गाजर
दैनिक एकूण: 1,223 कॅलरीज, 67 ग्रॅम प्रथिने, 170 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 38 ग्रॅम फायबर, 39 ग्रॅम चरबी, 9 ग्रॅम सॅट. चरबी., 1,284 मिलीग्राम सोडियम
दिवस पाचवा
सकाळी उठल्यावर –
१ ग्लास लिंबू मिसळून कोमट पाणी.
न्याहारी –
१/२ कप रोस्ट ओट्स, १ कप दुध, १ कप रास्पबेरी
दुपारचे जेवण –
फुलकोबी चिकन फ्राईड राइस, १ कप पालक सूप (7 Day Healthy Meal Plan)
संध्याकाळचा नाश्ता –
१ कप ब्लूबेरी ज्यूस
रात्रीचे जेवण –
१ १/४ कप चिकन राईस
दैनिक एकूण: 1,198 कॅलरीज, 77 ग्रॅम प्रथिने, 120 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 30 ग्रॅम फायबर, 48 ग्रॅम चरबी, 9 ग्रॅम सॅट. चरबी., 1,405 मिलीग्राम सोडियम.
दिवस सहावा
सकाळी उठल्यावर –
१ ग्लास लिंबू मिसळून कोमट पाणी.
न्याहारी –
मिक्स धान्यांचा टोस्ट ब्रेड आणि ब्लूबेरी जॅम , १ कप फॅट फ्री दूध, १ मध्यम संत्र
दुपारचे जेवण –
१ तुकडा सॅल्मन मासा, वाफवलेले बीन्स सॅलड
संध्याकाळचा नाश्ता –
१ कप रास्पबेरी ज्यूस
रात्रीचे जेवण –
फिश फ्राय आणि राईस
दैनिक एकूण: 1,206 कॅलरीज, 55 ग्रॅम प्रथिने, 187 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 55 ग्रॅम फायबर, 39 ग्रॅम चरबी, 8 ग्रॅम सॅट. चरबी., 1,203 मिलीग्राम सोडियम. (7 Day Healthy Meal Plan)
दिवस सातवा
सकाळी उठल्यावर –
१ ग्लास लिंबू मिसळून कोमट पाणी.
नाश्ता –
२ उकडलेली अंडी , १ ग्लास ब्लूबेरी ज्यूस
दुपारचे जेवण –
१ फिश प्लेट, व्हेज सलाड, गव्हाचा टोस्ट ब्रेड
संध्याकाळचा नाश्ता –
१ मध्यम संत्र्याचे ज्यूस
रात्रीचे जेवण –
१ प्लेट लेमन चिकन आणि १ कप उकडलेले मिनी बटाटे
दैनिक एकूण: 1,220 कॅलरीज, 64 ग्रॅम प्रथिने, 132 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 32 ग्रॅम फायबर, 51 ग्रॅम चरबी, 9 ग्रॅम सॅट. चरबी., 1,275 मिलीग्राम सोडियम.
असा ७ दिवस नियमित आहार केल्यास तुमचे शरीर सुदृढ राहण्यास मदत होईल. शिवाय पूर्ण आहार घेतल्याने शारीरिक ऊर्जा कायम राहील आणि रोग प्रतिकारशक्तीही मजबूत होईल. भारतीय खानपान पद्धतीनुसार वेगळा डाएट प्लॅन तयार करण्यात आला आहे तो आपण पुढील भागात जाणून घेऊ. (7 Day Healthy Meal Plan)
‘हे’ पण वाचा :-
Bad Health Habits: उत्तम स्वास्थ्यासाठी ‘या’ 25 वाईट सवयींची संगत आत्ताच सोडा; जाणून घ्या
बिनधास्त खा !!! मटण,चिकन,मासे किंवा अंडी; प्रत्येकाचे ‘हे’ आहेत फायदे
Food Tips: लग्नातलं जेवण अंगावर आलंय..? तर ‘या’ 5 टिप्स फॉलो कराच; जाणून घ्या
Foods To Avoid During Pregnancy: गर्भारपणात चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ; जाणून घ्या
‘Black Food’ म्हणजे काय? आणि त्याचा आरोग्यासाठी कसा फायदा होतो?; जाणून घ्या