आहारात असेल लिंबाचे लोणचे तर टेंशन कशाला आजारपणाचे?; जाणून घ्या फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। भारतीय आहारात डाळ, भात, भाजी, चपाती याला पूर्ण आहार असे म्हटले जाते. कारण ताटात डाळ आहे तर भात हवाच आणि भाजी आहे तर चपाती हवी. पण या सगळ्यांसोबत जर तोंडी लावायला लोणचे असेल तर? आहाहा…. अगदी तोंडाला पाणी सुटले नाही का.. अनेक लोकांना लोणचं हा प्रकार अतिशय भावतो. त्यांचं जेवण तोपर्यंत संपत नाही जोपर्यंत लोणच्याची एखादी आंबट गोड फोड तोंडी लावत नाहीत. आता तसं पाहिलं तर लोणच्याचे प्रकार खूप आहेत. आंब्याच्या कैरीचं लोणचं, आवळ्याचं लोणचं, मिरचीचं लोणचं आणि लिंबाचं लोणचं. या प्रत्येक लोणच्याची एक खासियत आणि आरोग्याच्या दृष्टीने गरज आहे. अनेक लोक लोणचं आरोग्यासाठी हानिकारक मानतात. पण यात तथ्य नाही. त्यामुळे बिंदास खा! यातील लिंबाच्या लोणच्याविषयी आज आपण खास माहिती करून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया खालीलप्रमाणे:-
– आपल्या आजूबाजूला नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या मीठ, मसाले आणि सूर्यप्रकाश व सुनिश्चित हंगाम याच्या सहाय्याने लोणचं तयार केलं जातं. आता हंगाम का तर.., उत्पादन वाया जाणार नाही तर त्यांचे पोषण मूल्य टिकेल आणि वाढेल म्हणून म्हणून.. लोणच्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के आणि प्रो- बायोटिक बॅक्टेरिया मुबलक प्रमाणात असतात. यातील लिंबाचे लोणचे हे सर्वांमध्ये आरोग्यदायी पर्यायांपैकी एक मानले जाते. आता लिंबाचे लोणचेच का ते जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
१) मजबूत रोग प्रतिकारक शक्ती – रोगप्रतिकारक शक्ती निरोगी ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे निरोगी खाणे. यासाठी तिखट लिंबाच्या लोणच्याचा खूप फायदा होतो. लिंबाच्या लोणच्यात कॉम्प्लेक्स बी जीवनसत्त्वे समाविष्ट असतात. यामुळे लिंबाचे लोणचे खाणे फायदेशीर आहे.
२) वजनावर नियंत्रण – लिंबाच्या लोणच्यात फॅट आणि बॅड कोलेस्टेरॉल नसते. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी आपल्या आहारात लिंबाचे लोणचे समाविष्ट करा. यामुळे वजन वाढत नाही.
३) शुगर लेव्हल कंट्रोल – शरीरात चांगला रक्त प्रवाह गरजेचा आहे. कारण रक्त प्रवाहातील चढ उतारांमुळे उच्च वा कमी रक्तदाबाची समस्या होते. हे दोन्ही धोकादायक असू शकते. यासाठी आहारात थोडेसे लिंबाचे लोणचे समाविष्ट करा, यामुळे रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. शिवाय लिंबाच्या लोणच्यातील तांबे, पोटॅशियम, लोह आणि कॅल्शियममूळे शरीरास इतर लाभ होतात.
४) पचनाच्या समस्या दूर – लिंबाच्या लोणच्यामध्ये एन्झाईम्स असतात. ज्यामुळे शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होते. परिणामी शरीरातील वाईट आणि अनावश्यक असे हानिकारक पदार्थ शरीराबाहेर उत्सर्जित होण्यासाठी मदत होते. यामुळे पाचन तंत्र निरोगी राहते.
५) हाडांची मजबुती – वयानुसार, आपल्या हाडांचे आरोग्य बिघडू लागते. विशेषतः स्त्रियांमध्ये लोह आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांचे नुकसान होते. लिंबाच्या लोणच्यातील कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, ए, पोटॅशियमने भरलेले असते. या सर्व तत्त्वांची हाडे निरोगी राहण्यास मदत होते.