लिंबाचा फक्त रस नव्हे तर सालसुद्धा आरोग्यदायी; जाणून घ्या फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन| लिंबाच्या रसा इतकीच लिंबाची साल देखील आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. कारण ज्या प्रमाणे लिंबातील पौष्टिक घटक त्याच्या रसामध्ये उतरलेले असतात त्याचप्रमाणे लिंबाचे अनेक गुणधर्म हे त्याच्या सालीतदेखिल समाविष्ट असतात. मुळात लिंबामध्ये बायोएक्टिव्हचे प्रमाण जास्त असते. जे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. तर लिंबाच्या सालीत फायबर आणि क जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते. एवढंच नव्हे तर, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देखील मोठ्या प्रमाणात या सालीत असतात.
एकंदरच लिंबाच्या सालीत व्हिटॉमिन ए, सी, पोटॅशियम, कॅल्शियम, फायबर यांसारखे अनेक पोषकघटक असतात आणि हे सर्व आपल्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेण्यास सक्षम असतात. चला तर जाणून घेऊयात लिंबाच्या सालीचे आरोग्यदायी फायदे :-
१) लिंबाच्या सालीमुळे आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढते. यासाठी दररोज गरम पाण्यात लिंबाची साल भिजवून ते पाणी कोमट झाल्यास प्यावे.
२) लिंबाच्या सलितील व्हिटॉमिन सी त्वचेसाठी लाभदायी आहेत. यामुळे त्वचेचा कॅन्सर आणि हृदयाचे आजार दूर होण्यास मदत होते.
३) लिंबाची साल रक्तदाब नियंत्रित ठेवते. यामुळे जर तुम्हाला रक्तदाबाची समस्या असेल तर हृदयसंबंधिच्या समस्या उद्भवण्याची शक्यता कमी होते.
४) लिंबाच्या सालीचे सेवन केल्यास लिव्हर अर्थात किडनी साफ होण्यास मदत होते. शिवाय यामुळे रक्ताभिसण चांगले होते.
५) लिंबाच्या सालीत असलेले मिनरल्स पचनक्रिया सुधारण्यासाठी सहाय्यक आहेत. यामुळे पचन अधिक चांगल्या प्रकारे होते आणि परिणामी अनेक आजारांपासून सुटका मिळते.
६) मधुमेहाने त्रस्त असलेल्या प्रत्येक रुग्णासाठी लिंबाची साल किसून त्याचं लोणचं किंवा रोजच्या अन्नपदार्थातून लिंबाची साल खाण्याने फायदा होतो. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
७) लिंबाच्या सालीत असलेल्या अॅँटी ऑक्सीडेंटमुळे स्किन कॅन्सरला प्रतिबंध होण्यास मदत होते.
८) लिंबाच्या सालीत कॅल्शियम आणि व्हिटॉमिन सी असल्यामुळे ती हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत.
९) तोंडाला दुर्गंधी येत असेल तर यासाठी लिंबाची साल तोंडात ठेवा किंवा लिंबाच्या सालीचे सेवन करा. यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते.
१०) मानसिक ताण आणि तणाव दूर करण्यासाठी लिंबाच्या सालीचा वापर करा. कारण या सालीमध्ये काही प्रमाणात फ्लेवानॉयड असते. त्यामुळे आपला ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस दूर होतो.