मधुमेहींच्या उत्तम आरोग्यासाठी दुधात मिसळा ‘हे’ पदार्थ; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। मधुमेह हा एक असा आजार आहे जो आजकाल कोणत्याही वयातील व्यक्तीला झाल्याचे निदर्शनास येत आहे. यात अगदी लहान मुलांचा देखील समावेश आहे. मुख्य म्हणजे हा आजार असा आहे जो माणसाला आतून हळूहळू पोखरत जातो. शिवाय तो एकदा कुणाला झाला की आयुष्यभर पाठ काही सोडत नाही. मधुमहाने ग्रासलेल्या व्यक्तीच्या जीवनशैलीवर अनेक बंधने येतात. जसे कि खाण्या पिण्याच्या सवयींमध्ये प्रामुख्याने बदल करावा लागतो. मधुमेहींना आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे बंधनकारक आहे. आधीच याना आयुष्यभर आहाराइतक्याच औषधांचा त्रास त्यात रक्तातील साखर न वाढवणारा घास. याचे मुख्य कारण म्हणजे मधुमेहींनी आहाराची विशेष काळजी घेतल्यास रक्तातील साखरेवर बऱ्याच अंशी नियंत्रण ठेवता येते. शिवाय दुधासोबत काही पदार्थ मिसळून सेवन केल्यास रक्तातील साखर आपोआपच नियंत्रणात राहते. चला तर जाणून घेऊया की दुधासोबत कोणत्या पदार्थांचे सेवन केलयास साखर नियंत्रणात राहते ते खालीलप्रमाणे:-
१) दालचिनी + दूध
– दालचिनीचा वापर लज्जतदार जेवणासाठी केला जातो. कारण दालचिनी पदार्थाची चव वाढवते. यासोबतच रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी दालचिनी उपयुक्त आहे. दालचिनीतील लोह, पोटॅशियम, जीवनसत्त्वे मधुमेहींच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. म्हणून झोपण्यापूर्वी दुधात दालचिनी मिसळून प्या. यामुळे रक्तातील साखर निश्चितच नियंत्रणात राहील.
२) हळद + दूध
– हळद मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. हळदीतील सर्व पोषक तत्व शरीराला विविध आजारांपासून सुरक्षित ठेवतात. त्यामुळे दुधासोबत हळदीचे मिश्रण पिणे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत कारण्यासाठी मदतयुक्त आहे.
३) गिलॉय स्टिक + हळद + आलं + पाणी + दूध
– गिलॉय स्टिक क्रश करा आणि १/२ ग्लास दूध आणि १/२ पाण्याच्या मिश्रणात टाका. आता यात थोडी हळद आणि आले घालून चांगले उकळा. ते अर्धवट राहिल्यावर गाळून प्या. हे पेय दिवसातून २ वेळा प्या. यामुळे मधुमेह नियंत्रणात राहील.