| |

हिवाळ्यात पाणी पिण्यास टाळाटाळ करणे पडू शकते महागात; जाणून घ्या दुष्परिणाम

हॅलो आरोग्य ऑनलाईन। थंडीच्या दिवसात वातावरणात मोठ्या प्रमाणात गारठा जाणवतो. यामुळे आपल्याला तहान कमी लागते. परिणामी आपण पाणी पिण्यास टाळाटाळ करतो. पण अश्या पद्धतीने पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करणे शरीराच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. कारण नियमित गरजेनुसार शरीरास पाणी न मिळाल्याने शरीरात पाण्याची कमतरता होते आणि आपण डिहायड्रेशला बाली पडतो. आपल्याला उत्तम आरोग्यासाठी नियमितपणे शरीरासाठी आवश्यक तितके पाणी पिणे आवश्‍यक आहे. कारण शरिरातल्या विषारी पदार्थांना बाहेर फेकण्यासाठी पाण्याची गरज असते. त्यामुळे शरीरातली पाण्याची पातळी बिघडणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. जाणून घ्या होणारे दुष्परिणाम खालीलप्रमाणे:-

१) थंडीच्या दिवसात देखील इतर इतर दिवसांप्रमाणे शरीराला पाण्याची आवश्यकता असते. दरम्यान गरजेइतके पाणी शरीराला मिळाले नाही तर त्याचा परिणाम किडनी आणि सांध्यांवर होतो. कारण कमी पाणी प्यायल्याने विषारी पदार्थ शरीराबाहेर जात नाहीत.

२) शरीरात पाण्याची कमतरता जाणवल्यास आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. परिणामी विविध आजार आपल्या शरीरावर हल्ला करतात आणि आपले शरीर असमर्थ असल्यामुळे आपण आजारी पडतो.

३) शरीरात पाणी कमी झाल्यास आपले शरीर डिहायड्रेट होते. परिणामी अपचनासारख्या पोटाच्या तक्रारी जाणवतात.

४) शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास त्याचा हृदयावरसुद्धा गंभीर परिणाम होतो. कारण शरीरात पाण्याची कमतरता असल्याने रक्तप्रवाह अस्थिर होतो आणि सर्व भागांपर्यंत रक्त वेळेत पोहोचू शकत नाही. त्यामुळे हृदयाला धोका निर्माण होतो.

५) पाणी कमी प्यायल्याने सांधेदुखीचा त्रास जाणवतो. शिवाय हा त्रास दिवसागणिक वाढत जातो आणि गंभीर स्वरूप धारण करतो.

६) शरीरात कमी पाण्यामुळे आपल्या त्वचेचा ओलसरपणा कमी होतो. परिणामी त्वचा कोरडी पडते. यामुळे त्वचा निस्तेज होते आणि पापुद्रे निघू लागतात.

७) शरीरात पाण्याची कमतरता असल्याने घाम कमी येतो. परंतु घामाद्वारे शरीरातले विषारी पदार्थ बाहेर पडत असतात आणि घाम कमी झाल्यामुळे ते शरीरातच राहतात. अशावेळी मासिकपाळीमध्ये प्रचंड त्रास होतो.

० मग काय करायचे?

– पाणी पिण्यासाठी रूटीन तयार करा.

– कुठेही जाताना पाण्याची बाटली जवळ ठेवा.

– स्ट्रॉ असलेल्या बाटलीने पाणी प्या. यामुळे सहज आणि हळूहळू एक एक घोट पाणी पिता येतं.

– रात्री झोपताना पाण्याची एक बाटली जवळ ठेवा. कारण रात्रभर पाणी न प्याल्याने डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते.

– थंडीत पाणी प्यायलं जात नसेल, तर लिंबू पाणी वा जिऱ्याचं पाणी प्या.