निरोगी आरोग्यासाठी बिनधास्त खा ‘पाणीपुरी’; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आम्ही जाणतो कि केवळ शीर्षक वाचल्याने अनेकांच्या मनात आनंदाच्या लहरी उठल्या असतील. कारण पाणीपुरी हा पदार्थच असा आहे कि बस नाम काफी है। पाणीपुरी म्हटलं का अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. मग पोट भरलेलं का असेना पाणीपुरी खाना तोह बनता है। भारतात पाणीपुरी खाणाऱ्या लोकांची संख्या मोप आहे. विशेषतः महिलावर्ग पाणीपुरी खाण्य्साठीऊ भयंकर उत्साही असतो. पण अनेक पाणीपुरी विक्रेत्यांचा हेळसांडपणा आणि अस्वच्छता आपल्या आरोग्याचे नुकसान करण्यास कारणीभूत ठरते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एकतर घरच्या घरी पाणीपुरी बनवण्याची सोप्पी पद्धत सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही तुम्हाला आवडणारी पाणीपुरी एकदम भैय्या स्टाईल घरच्या घरी बनवू शकाल आणि याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे पाणीपुरी खाल्ल्याने होणारे आरोग्यविषयक फायदेदेखील आज आपण जाणून घेणार आहोत. कारण पाणीपुरीसुद्धा आरोग्यदायी होऊ शकते. चला तर जाणून घेऊयात पाणी बनविण्यासाठी लागणारे साहित्य, कृती आणि फायदे खालीलप्रमाणे:-
० पाणीपुरी बनविण्यासाठी लागणारे साहित्य
– ६ ते ७ मोठे कप पाणी
– १ जुडी पुदिना
– लिंबाच्या आकाराएवढी चिंच
– २ ते ३ हिरव्या मिरच्या
– १ लहान आल्याचा तुकडा
– १ चमचा जीरे
– २ ते ३ लवंगा
– १/४ चमचा मिरपूड
– १/४ लाल तिखट
– १/४ आमचूर पावडर
– १ चमचा गूळ पावडर वा छोटा खडा
– चवीनुसार मीठ
– १/२ लिंबाचा रस
० सारणासाठी :
– १ वाटी मोड आलेले आणि हळद, मीठ घालून वाफवलेले मूग वा मटकी
– २ ते ३ मोठे उकडलेले बटाटे स्मॅश करू
– खारी बुंदी
० कृती – सगळ्यात आधी चिंचेचा कोळ तयार करुन घ्या. हिरव्या मिरच्या, आले, पुदिना, जीरे, लवंगा, मिरपूड, तिखट, मीठ ह्यांची बारीक चटणी करुन घ्या. यानंतर नंतर वाटलेली चटणी, चिंचेचा कोळ आणि गूळ एकत्र करा. ह्या पाण्यात लिंबाचा रस घाला. आता पाणीपुरीच्या पुऱ्या तळून घ्या किंवा बाजार मिळणारे रेडिमेड पॉकेट वापरा.
– आता पाणीपुरी खायला तयार करताना प्रत्येक पुरी वरच्या बाजूने अंगठ्याच्या सहाय्याने थोडी फोडून त्यात उकडलेले स्प्राऊट आणि थोडा बटाट्याचा चुरा, खारी बुंदी भरुन पुरी पाण्यात बुडवून लगेच खा आणि आस्वाद घ्या.
० फायदे :
१) पाणीपुरी पचनक्रियेसाठी लाभदायक आहे. कारण पाणीपुरीच्या पाण्यात धने, सैंधव मीठ, जिरे मिरची, टार्टरिक इत्यादी असते.
२) पाणीपुरीच्या सेवनाने पचनक्रियेच्या अनेक आजारांपासून सुटका होते.
३) आंबट ढेकर, मळमळ, गॅस आणि अपचनसारख्या समस्या पाणीपुरीच्या सेवनाने दूर होतात.
४) पाणीपुरीचे सेवन आठवड्यातून 2 वेळा आवश्य करावे. यामुळे आपली पचनक्रिया निरोगी आणि मजबूत होईल.
० पाणीपुरी खाण्याचे प्रमाण
– आठवड्यातून फक्त २ वेळाच पाणीपुरी खाणे फायदेशीर आहे. कारण पाणीपुरीचे जास्त सेवन पचनक्रियेसाठी हानिकारक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच एकावेळी खाताना १२ पेक्षा जास्त पाणीपुरी खाऊ नका.
० पावसाळ्यात पाणीपुरी खाणे टाळा.
– पावसाळ्यात पाणीपुरी खाणे आरोग्यास हानीकारक असते. कारण पावसाळ्यात आधीच पचनक्रिया मंदावलेली असते. शिवाय पाणीदेखील चांगले नसेल तर निश्चितच आजारपणाचे कारण ठरू शकते. त्यामुळे घराबाहेरची पाणीपुरी नकोच. पण घरगुती पाणीपुरी अगदीच मन मारता आलं नाही तर जरूर खा.