EggPlant
| | |

मधुमेहींनो वांगी खा आणि रक्तातील शुगर करा कंट्रोल; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। चुकीची जीवनशैली आणि चुकीची आहार पद्धती हळूहळू आपल्या आरोग्याचे नुकसान करू लागते. यामुळे अगदी आपल्या नकळत आपण आजाराच्या तोंडी जातो. आजकाल बहुतेक लोकांमध्ये आढळणारा आजार म्हणून मधुमेहाकडे पाहिले जाते. मुख्य म्हणजे हा आजार अगदी कोणत्याही वयातील लोकांना होऊ शकतो. त्यात आजकालची जीवनपद्धती पाहता मधुमेहाने ग्रासणाऱ्या तरुणांची संख्या सर्वाधिक आहे.

० मधुमेहाचे चार मुख्य प्रकार आहेत. टाईप-१, टाईप-२, गर्भावस्थेतील मधुमेह आणि प्री-डायबेटिस. यातील मधुमेह टाइप-२ हा सर्वात धोकादायक आहे. यात इंसुलिन प्रतिरोधकता आणि रक्तातील साखरेची वाढलेली पातळी सर्वात सामान्य मानली जाते. जी कालांतराने संपूर्ण आरोग्यावर परिणाम करते. या रुग्णांसाठी उच्च फायबरयुक्त पदार्थ खाणे फायदेशीर मानले जाते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी वांगी खाणे फायदेशीर आहे.

  • वांग्यामध्ये व्हिटॅमिन ए, फॉस्फरस आणि काही अद्वितीय क्षार असतात. हे नसा शांत करतात आणि तणाव दूर करतात. शिवाय स्वादुपिंड, यकृत आणि मूत्रपिंड मजबूत करण्यासाठी देखील वांगी फायदेशीर आहेत. वांग्यामध्ये शक्तिशाली फ्री रॅडिकल स्कॅव्हेंजर फिनोलिक घटक असतात. त्यात अँथोसॅनिनस, फ्लेव्होनॉइड्स आणि क्लोरोजेनिक ऍसिड असते. हे शरीरासाठी अँटिऑक्सिडेंट म्हणून कार्य करते. त्यामुळे वांगी कोणत्याही प्रकारे खाल्ल्यास मधुमेह, दूर होतो.

० मधुमेहाची प्रमुख लक्षणे
– वारंवार तहान लागणे.
– वारंवार लघवी होणे. (पॉलीयुरिया)
– अचानक वजन कमी होणे.
– थकवा जाणवणे.
– स्त्रियांमध्ये, वारंवार योनिमार्गात संक्रमण
– भूक वाढणे.

० वांगी खाल्ल्यास होणारे फायदे:-

१) रक्तातील साखरेवर नियंत्रण –
मधुमेही रुग्णांसाठी वांगी खाणे अतिशय उपयुक्त आहेत. कारण वांगी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. शिवाय वांगी ही स्टार्च नसलेली भाजी आहे. यामुळे वांगी खाणे फायदेशीर आहे.

२) कोलेस्ट्रॉल मुक्त व्हाल –
वांगी खाल्ल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते. याचा हृदयाच्या आरोग्यास फायदा होतो. शिवाय मधुमेहींच्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होणे त्यांच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.

३) लो ग्लायसेमिक इंडेक्स –
वांग्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. शिवाय इतर कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांच्या तुलनेत रक्तातील साखर वाढण्यास वांगी प्रतिबंध करतात. यामुळे मधुमेहींच्या आरोग्याला फायदा होतो.

४) हृदय विकारापासून संरक्षण –
मधुमेहींनी वांग्याचे सेवन केल्यास त्यांच्या शरीरातील अँटि ऑक्सिडंट्सचे प्रमाण वाढते. या अँटी-ऑक्सिडंट्सच्या मदतीने शरीर फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान टाळू शकते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका साहजिकच कमी होतो आणि हृदयाचे रक्षण होते.

५) फायबरयुक्त वांगी – फायबरची उच्च मात्रा आणि विद्रव्य कर्बोदकांमधे कमी प्रमाणात असल्यामुळे वांगी मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी एक आदर्श आहार आहे. जेव्हा मधुमेहाची पातळी अस्थिर असेल आणि शरीरात रक्तातील साखरेत तीव्र चढ उतार होत असेल तर मधुमेहाच्या संभाव्य धोकादायक बाजूस वांगी प्रतिबंध करतात.