कोरोना विषाणूवर आपण मात करू शकतो?; जाणून घ्या काय सांगतो WHO’चा रिसर्च रिपोर्ट
हॅलो आरोग्य ऑनलाईन। संपूर्ण जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर दिसू लागला आहे. आता कुठे लोकांनी जगायला पुन्हा सुरुवात केली तोच कोरोनानारे आपले डोके वर काढले आणि सगळं जग पुन्हा एकदा थांबण्याच्या दिशेकडे वाट करताना दिसू लागले आहे. दिवसागणिक कोरोनाचे रूग्ण इतके वाढताना दिसत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये एकंदरच चिंतेचे आणि घबराटीचे वातावरण दिसू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर WHO कडून दिलासाजनक वक्तव्य करण्यात आले आहे. WHO’ चे प्रमुख माध्यमांना संबोधित करताना आपल्या रिसर्च रिपोर्टच्या जोरावर म्हणाले कि, आपण लवकरच या संकटावर मात करू. हे इतकेच वक्तव्य लोकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
WHO’ चे प्रमुख टेड्रोस अधनॉम गेब्रेयसस यांनी माध्यमांना संबोधित करताना सांगितले कि, कोविड-19 च्या ओमिक्रॉन आणि डेल्टा व्हेरिएंटच्या केसेसची ‘त्सुनामी’ येण्याची नक्कीच तीव्र शक्यता आहे. मात्र पुढच्या वर्षभरात संपूर्ण जग या महामारीवर मात करेल, अशी आशा आहे. कोरोनाचे पहिले निदान झाल्यानंतर 2 वर्षांनी, UNHE’ च्या उच्च अधिकाऱ्यांनी इशारा दिलाय की, ओमिक्रॉनच्या सौम्य लक्षणांमुळे संसर्गाच्या आकडेवारीवरून माहिती घेणं गडबडीचं ठरेल. म्हणून संशोधकांनी अजूनही यावर काम करणे गरजेचे आहे.
गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनचा संसर्ग अमेरिका आणि युरोपच्या अनेक भागांमध्ये पसरल्याचे समोर आले. यानंतर आता WHOच्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्याभरात समोर आलेल्या कोरोनाच्या प्रकरणांची संख्या अगोदरच्या आठवड्यातील संख्येपेक्षा 11% अधिक आहे. UNHE’ने (युनायटेड नेशन्स हेल्थ एजन्सी) मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार, 20-26 डिसेंबर दरम्यान सुमारे 49.9 दशलक्ष नवीन प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत.