Pomegranate
| | |

डाळिंबाचे दाणे देतात अनेक आजारांपासून संरक्षण; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन| तसे पहाल तर प्रत्येक फळ हे आपल्या आरोग्याची उत्तमरित्या काळजी घेण्यास सक्षम असते. प्रत्येक फळाची एक विशेष बाब असते. अनेक विशेष गुणधर्म असतात. जे आपल्या शरीराला आवश्यक असणारे अनेक तत्त्व सहजोगत्या देऊ शकतात. जसे की, सफरचंद, किवी, केळी, पेरू आणि डाळिंब. होय. डाळींब सुद्धा. कारण डाळिंबाचे दाणे जितके आकर्षक लालबुंद तितकेच खायला चविष्ट आणि आरोग्यासाठी पौष्टिक आहेत. कारण इतर फळांच्या तुलनेत डाळिंबात सर्वाधिक पोषक तत्वे असतात.

सर्वसाधारणपणे, एका डाळिंबात
7 ग्रॅम फायबर,
3 ग्रॅम प्रोटीन,
30 टक्के व्हिटॅमिन सी,
16 टक्के फोलेट,
12 टक्के पोटॅशियम असते.
तर, एक कप डाळिंबाच्या बियांमधून 24 ग्रॅम साखर आणि 144 कॅलरी ऊर्जा मिळते.

डाळिंबाचे दाणे

डाळिंबात असणारे प्युनिसेलगिन्स हे अँटिऑक्सिडंट आणि प्युनिकिक हे फॅटी अॅसिड आहे. शिवाय डाळिंबात दाहक-विरोधी गुणधर्म असतात. यामुळे मधुमेह, कर्करोग, अल्झायमर, लठ्ठपणा यांसारख्या आजारांशी लढण्याची क्षमता असते. याशिवाय डाळिंबात व्हिटॅमिन ए, सी आणि व्हिटॅमिन ई असते. जे चांगल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. चला तर जाणून घेऊ डाळिंबाचे फायदे खालीलप्रमाणे:-

  1. ऑक्सिजन पातळी वाढते – डाळिंबाचे दाणे रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवतात. शिवाय डाळिंबातील अँटी-ऑक्सिडंट फ्री रॅडिकल्सशी लढतात आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोल करतात. परिणामी रक्ताभिसरण सुरळीत होऊन रक्तप्रवाह व्यवस्थित सुरू राहतो.
  2. रक्तदाबावर कंट्रोल – तज्ञांच्या अभ्यासानुसार, दोन आठवडे दररोज 150 मिली डाळिंबाचा रस प्यायल्याने उच्च रक्तदाब लक्षणीयरीत्या कमी होतो. शिवाय डाळिंबाचे सेवन रक्तदाब कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. कारण डाळिंबात असलेले अँटीऑक्सिडंट्स रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होऊ देत नाही.
  3. फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण – डाळिंबातील अँटी-ऑक्सिडंट्स शरीराला फ्री रॅडिकल्सच्या प्रभावापासून वाचवतात. यामुळे अकाली वृद्धत्वाची समस्या दूर होते.
  4. तोंडाचे आरोग्य सुधारते – डाळिंबाचे अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म तोंडात प्लाक आणि बॅक्टरिया तयार होण्यास प्रतिबंध करते. शिवाय डाळिंबाचा रस हिरड्यांची सूज कमी करतो आणि पीरियडॉन्टायटीसपासून आराम देतो.
  5. स्मरणशक्ती वाढते – डाळिंबामुळे स्मरणशक्ती वाढण्यासही मदत होते. एका संशोधनानुसार, रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर 2 ग्रॅम डाळिंबाचा अर्क दिल्यास त्यांच्या स्मरणशक्तीत सुधारणा होते. शिवाय डाळिंबाचे नियमित सेवन अल्झायमर रोखण्यासाठी प्रभावी आहे.
  6. वजन नियंत्रणात राहते – डाळिंब शरीरातील चरबी नियंत्रित करते, ज्यामुळे लठ्ठपणा कमी होतो. शिवाय डाळिंबात कॅलरी कमी असतात आणि फायबर जास्त. यामुळे पोट भरलेले राहते. त्यामुळे वजन वेगात नियंत्रित करायचे असेल तर डाळिंब खा.