जेवणानंतर लगेच पाणी पिण्याची सवय शरीरासाठी हानिकारक; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्यापैकी अनेकजण असे असतील ज्यांना जेवताना आणि जेवणानंतर पाणी प्यायची सवय असेल. आपल्या शरीरासाठी पाणी पिणे आवश्यक आहे. पण पाणी पिण्याच्या काही वेळा पाळणे अत्यंत गरजेचे आहे. जसे की अनेकदा आपल्याला डॉक्टर सांगतात की, जेवताना आणि जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. यामुळे आपल्या शरीराचे नुकसान होऊ शकते पण, आपल्या आहारात एखादा कोरडा पदार्थ आलाच तर पाण्याची गरज ही लागतेच. अश्यावेळी पाण्याऐवजी मूग डाळीचा पाणी पिण्यावर भर द्या.कारण साधे पाणी शरीरासाठी आवश्यक असले तरीही वेळ चुकली तर हेच पाणी शरीरासाठी नुकसान करणारे ठरू शकते. चला तर जाणून घेऊयात याबाबत तज्ञ काय सांगतात ते खालीलप्रमाणे:-
० जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने काय होते?
तज्ज्ञांच्या मते, एकवेळ जेवणादरम्यान पाणी पिणे सुरक्षित आहे. परंतु, जेवण खाण्यापूर्वी वा नंतर ताबडतोब पाणी प्यायल्याने पचनसंस्थेला त्रास होतो. परिणामी पचनक्रियेत बिघाड होतो. कारण, खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी प्यायल्याने जठरासंबंधीत रस पाचन तंत्रामधून सोडलेल्या पाचन एंजाइममध्ये विरघळते. ज्यामुळे शरीराला अन्नामधून पुरेसे पोषक द्रव्य मिळत नाही. यामुळे गॅस, अपचन, अॅसिडिटीसारख्या समस्या होण्याचीही शक्यता निर्माण होते.
० मग कधी पाणी प्यावे?
- मित्रांनो तज्ञ सांगतात कि, जेवण करण्यापूर्वी अर्धा तास आधी नेहमी पाणी प्यावे आणि जेवल्यानंतर किमान अर्धा तासानंतर पाणी प्यावे. याचे कारण म्हणजे, अन्न खाल्ल्यानंतर किमान ३० मिनिट पूर्ण झाल्यानंतर पोटात पुढील प्रक्रियेस सुरुवात होते. म्हणून यानंतर, पाणी पिण्यामुळे पाचक समस्या उद्भवत नाहीत आणि अन्न देखील सहज पचते.
० जेवणानंतर लगेच नाही पण जेवताना पाणी पिणे योग्य आहे का?
- तज्ञांच्या सांगण्याप्रमाणे, जेवणादरम्यान थोडे- थोडे पाणी प्यायल्याने शरीराचे कोणतेही नुकसान होत नाही. परंतु, जर आपण अन्नासह भरपूर पाणी प्यायलात तर मग यामुळे आपले पोट लगेच भरते. शिवाय पोटात फुगवटा तयार होतो.