छातीतली जळजळ थांबवायची असेल तर करा घरगुती उपाय; कोणते? ते जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या देशात खाणाऱ्यांची आणि खिलवणाऱ्यांची संख्या काही तोकडी नाही. त्यामुळे अस्सल चवीचे खवय्ये आपल्याकडे अत्र तत्र सर्वत्र भेटतील. अश्या चवीने खाणाऱ्यांना आपल्या आरोग्यापेक्षा आपल्या जिभेची जास्त काळजी असते. त्यामुळे जेव्हा जिथे जे खावं वाटेल ते हमखास खाण्यासाठी हे लोक काहीही करतात. पण मित्रांनो तुम्हाला असं नाही वाटत का कि तुमची खवय्येगिरी तुमच्याच अंगलट येतेय. अनेकदा आपण मिळालं कि ओरबाडलं अश्या पद्धतीने जेवतो. अनेकांना तर भूक सहन होतच नाही. हे लोक जे मिळेल ते खातात. लज्जतदार, तेलकट, मसालेदार, खमंग हे असे पदार्थ खाण्याच्या नादात जिभेचे चोचले तर पूर्ण होतात पण शरीराची पूर्ती वाट लागते. यात प्रामुख्याने पोटाचा समावेश आहे.
या सगळ्यामुळे जाणवणारी एक अतिशय सामान्य समस्या म्हणजे छातीत जळजळ होणे. वास्तविक, अन्नपचन प्रक्रियेत आपल्या पोटात असे ऍसिड तयार होत असते जे अन्नपचनास सहाय्य करत असते.पण कधी कधी हे अॅसिड जास्त प्रमाणात तयार झाल्याने छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो. मग यानंतर लोक विविध औषधे खातात अनेकांना तर अश्या औषधांची सवयच लागते. पण आम्ही काय म्हणतो? प्रत्येक समस्येवर औषध कशाला? जेव्हा आपल्याकडे घरगुती उपायांचा खजिना आहे तेव्हा खर्च औषधांची गरज आहे का? अजिबात नाही. आज आम्ही तुम्हाला असेच कमाल घरगुती उपाय सांगणार आहोत जे छातीत होणारी जळजळ, अॅसिडिटी या समस्या दूर करतील. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
जर तुम्हालाही छातीत जळजळ होण्याची समस्या असेल तर वरीलपैकी कोणताही उपाय जरूर करून पहा. पण मित्रांनो लक्षात ठेवा, यांपैकी कोणत्याही उपायाने आराम मिळत नसेल तर वेळ न घालवता डॉक्टरांकडे जा आणि त्यांच्या सल्ल्यानेच औषधे आणि गोळ्या घ्या.