Boosts Immunity
|

इम्युनिटी वाढविण्यासाठी सोप्पे उपाय शोधताय?; लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। जर आपल्याला सुदृढ आणि निरोगी आयुष्य जगायचे असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या शरीराची इम्युनिटी पावर सक्षम असायला हवी. आता इम्युनिटी म्हणजे काय? तर अगदी सोप्प्या भाषेत सांगायचं म्हटलं तर इम्युनिटी म्हणजे रोग प्रतिकार शक्ती. आपल्या शरीराची रोज प्रतिकार शक्ती जर मजबूत असेल तर कोणताही विषाणू आणि संसर्ग तुमच्या शरीरात शिरकाव करू शकत नाही. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असल्यामुळे सारे चिंतेत आहेत. अशावेळी साहजिक लोक इम्युनिटी बूस्ट करण्याचे काही ना काही उपाय शोधत आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्पे आणि फायदेशीर असे उपाय सांगणार आहोत ज्यांच्या सहाय्याने तुम्ही तुमची इम्युनिटी बूस्ट करू शकाल. चला तर मग लगेच जाणून घेऊयात इम्युनिटी वाढविणारे सोप्पे उपाय खालिलप्रमाणे:-

हर्बल टी

हर्बल टी – साध्या चहामध्ये कॅफेन असतं. जे शरीराला हानी पोहोचवतं. मग अश्यावेळी इम्युनिटी वाढवायची असेल तर हर्बल टी उत्तम पर्याय आहे. हा चहा बनवण्यासाठी विविध औषधी वनस्पती तसेच मसाल्यांचा वापर करतात. यातील अँटी इंफ्लामेटरी गुणधर्म आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म जळजळ, सर्दी आणि फ्लूपासून आराम देऊन इम्युनिटी बूस्ट करतात.

च्यवनप्राश

च्यवनप्राशचे सेवन – च्यवनप्राश खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते असं सिद्ध झालं आहे. कारण यात विविध औषधी वनस्पती वापरल्या जातात. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी हळदीच्या दुधासोबत किंवा गरम पाण्यातून च्यवनप्राशचे सेवन करा.

Termeric Milk
हळदीचे दूध

हळदीचं दूध – हळदीत अनेक औषधी गुणधर्म असतात. जे कोणत्याही प्रकारची दुखापत भरून काढण्यासाठी सहाय्यक आहेत. त्यामुळे अनेकजण दुखापत झाल्यास हळदीचे दूध पिण्याचा सल्ला देतात. हळदीच्या दुधातील घटक शरीरात प्रवेश करून विषाणूंना रोखण्याचे काम करतात. त्यामुळे रोज रात्री १ ग्लास दुधात १ चमचा हळद मिसळून प्या. यामुळे रोगप्रतिकारक शक्तीदेखील मजबूत होते.

नस्य थेरपी

नस्य थेरेपी – नस्य थेरपीसाठी खोबरेल तेल, तिळाचं तेल किंवा तुपाचे २ थेंब नाकपुडीत सोडा. असे केल्यास शरीरात व्हायरस शिरण्यास प्रतिबंध केला जातो. यासाठी दोन्ही नाकपुडीत तूप किंवा तेलाचे २ थेंब टाकून काही मिनिटं झोपा. असे केल्यास शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

प्राणायाम

फुफ्फुसांसाठी योगासन – कोणताही विषाणू सगळ्यात आधी थेट फुफ्फुसावर हल्ला करतो. यामुळे श्वसनसंस्था कमकुवत होते. म्हणून आपल्या फुफ्फुसांचे कार्य मजबूत आणि सक्षम ठेवण्यासाठी प्राणायाम, कपालभाती आणि भस्त्रिका प्राणायाम यांसारख्या आसनांचा निमित्त शैलीत समावेश करा.