मान अवघडली तर दुखणं सहन करण्याऐवजी ‘हे’ उपाय करा; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। रात्री चुकीच्या स्थितीत झोपलात तर सकाळी उठल्यावर मानेचं दुखणं नक्कीच होत. जर तुमच्याही बाबतीत असं होत असेल तर हि माहिती तुमच्याचसाठी आहे. कारण झोपण्याची स्थिती चुकली किंवा योग्य उशी न वापरल्यास मानेच्या शिरा आखडतात आणि परिणामी मान दुखू लागते. या त्रासाला मान आखडणे, मान जखडणे किंवा मान लचकणे असेही म्हणतात. अशावेळी मान वळवताना किंवा अगदी वाकतानादेखील मानेत तीव्र वेदना जाणवू लागतात. हा त्रास मुख्यतः मानेतील मांसपेशी आणि सॉफ्ट टिश्यू यांमध्ये ताण निर्माण झाल्याने होतो. आजकाल दिवसभर कामात व्यग्र सणाऱ्या लोकांचे बहुतेक काम हे माना खाली घालून करण्याचे असते. म्हणजेच स्मार्टफोनचा वापर, लॅपटॉप वा संगणकाचा वापर यामुळे मान आणि पाठ दोन्हीचे दुखणे येते. बहुतेकदा बराचवेळ एकाच स्थितीत मान ठेवण्यामुळेदेखील मानेचे दुखणे संभवते.
याशिवाय वयोमानापरत्वे मान दुखण्याची समस्या हि नेहमीची तक्रार वाटू लागते. साधारणपणे मध्यमवयीन व वृद्ध व्यक्तींमध्ये मान दुखण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. शिवाय ज्यांना स्पाँडिलीसिस’चा त्रास असतो त्यांच्यासाठी हे दुखणे रोजचे असते. त्यामुळे अनेकदा मानेच्या दुखण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते आणि हे दुखणं वाढलं कि मग औषधोपचार सुरु केले जातात. पण वेळीच खबरदारी घेतली तर हे दुखणं येतच नाहीत. शिवाय मानेचं दुखणं आलंच तर काही साध्या सोप्प्या व्यायामाच्या आणि उपायांच्या सहाय्याने मानेचं दुखणं घालवा. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-