रात्री झोप मोड झाली कि पुन्हा लागत नाही? करा ‘हे’ उपाय; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। बदलती जीवनशैली आपल्या दैनंदिन बाबींशिवाय आपल्या आरोग्यावर परिणाम करीत असते. रोजची धावपळ, दगदग आणि डोक्यात चालू असलेले विचार ना जेवून देतात ना झोपून देतात. अनेकदा खूप दमल्यानंतर एखादी व्यक्ती अगदी गाढ झोपी जाते. पण मध्यरात्री अचानक जाग आल्यानंतर ती व्यक्ती पुन्हा झोपू शकत नाही. याचे कारण कुणी झोपू देत नाही असे नसून झोप येतच नाही असे आहे. तुमच्याही बाबतीत असे होते का? अर्थात तुम्हालाही अर्धवट झोपेची समस्या आहे. शांत आणि व्यवस्थित झोप झाली नाही तर दुसरा दिवस अतिशय चिडचिड करत जातो. इतकंच काय तर कामातदेखील लक्ष जात नाही. वाढत्या स्पर्धात्मक युगात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी रात्रीचा दिवस करणारे बरेच जण आहेत. पण यामुळे झोपेचे खोबरे झाले कि मग आरोग्यविषयक अनेक तक्रारी निर्माण होतात.
आजकाल अनेकांना अनिद्रेचा त्रास होतो. मग अशावेळी झोप चांगली येण्यासाठी लोक औषधे गेहतात. ब्राह्मी, जटामांसी, मंडूकपर्णी वगैरे वनस्पतींपासून तयार केलेले सॅन रिलॅक्स सिरपसारखे सिरप रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास मन शांत होते आणि गाढ झोप लागते. यामुळे झोप मोडत नाही. दरम्यान मानसिक अस्वास्थ्यामुळे वा असंतुलनामुळे झोप येत नसेल तर ब्राह्मी स्वरसाचे नस्य, क्षीरधारा, शिरोधारा, शिरोबस्ती आदी आयुर्वेद संबंधित उपचार थेरेपी करून घेतल्यासही लाभ होतो. पण काही घरगुती उपाय असे आहेत ज्यांच्या सहाय्याने तुमचे मानसिक आरोग्य स्थिर होईल आणि अनिद्रेचा त्रास दूर होईल.
० चांगल्या झोपेसाठी ‘हे’ घरगुती उपाय करा
1. रात्री झोपण्यापूर्वी टाळूवर तेल लावून मसाज करा. यानंतर नाकात घरी बनविलेले साजूक तूप टाका म्हणजे झोप शांत लागेल.
2. रात्री झोपताना रटाळवाणी पुस्तके वाचा. अभ्यास करा. असे केल्यास हमखास झोप येते.
3. डोक्यात विचार घोळत असतील तर झोपण्याआधी १० मिनिटे मेडिटेशन करा.
4. रात्री जेवल्यानंतर लगेच अंथरुणात लोळू नका. रात्री झोपण्यापूर्वी किमान १ तास चाला.
5. संध्याकाळचे जेवण शक्य तितके हलके घ्या. तेलकट, मसालेदार, आंबवलेले पदार्थ खाऊ नका.
6. झोपण्याच्या अर्धा तास आधी मोबाईल, टेलिव्हीजन, कॉम्प्युटर यांसारख्या कोणत्याही डिजिटल स्क्रीनचा वापर करू नका.
7. दूध पचत असल्यास, व्यर्ज नसल्यास रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर दूध साखर न टाकता प्या. या दुधासोबत बदाम वा केळं खाणे फायदेशीर ठरते.
8. झोपण्याआधी जायफळ तुपात उगाळून लेप बनवा आणि कपाळावर लावा यामुळेदेखील गाढ झोप येते.
9. ज्यांच्या प्रकृतीला वांगे चालत असेल त्यांनी वांगे भाजून घ्यावे, ते थंड झाले की त्यात मध मिसळून खाल्ले तरी झोप येण्यास मदत होते
10. रात्री झोपण्याआधी कॅफीनयुक्त पदार्थ पिऊ नये. किमान दोन तास आधी तरी चहा/कॉफी/चॉकलेट/साखर असे पदार्थ पूर्ण टाळा.