गूळ- मखाना खा आणि अनुभवा आरोग्यवर्धक लाभ; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल फिटनेस फ्रिक लोकांची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. याचे कारण म्हणजे लोकांना आता हे लक्षात येत आहे कि, वेळीच आरोग्याकडे लक्ष दिले तर आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत नाही. त्यामुळे आजकाल वजनावर नियंत्रण ठेवणाऱ्या पदार्थांचा आहारात हमखास समावेश केला जातो. यामध्ये गूळ, तूप आणि मखान्याचा जास्तीत जास्त वापर केला जातो. पण जर हे पदार्थ तुम्ही एकत्र करून खाल्ले तर याची चव वाढेल आणि यासोबतच तुम्हाला हवे असलेले सर्व पोषक घटकांची मात्राही वाढेल. याचे कारण म्हणजे, या तिन्ही पदार्थांमध्ये कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, लोह आणि फॉस्फरस यांसारखे पोषक घटक आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. शिवाय यात हेल्दी फॅटचे प्रमाण जास्त आणि सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण कमी असते. त्यामुळे हे तिन्ही पदार्थ एकत्र खाणे फायदेशीर आहे.
० गूळ- मखाना कसे बनवाल?
० साहित्य - १ वाटी गूळ, १ चमचा तूप आणि २ वाटी मखाना
० कृती - सगळ्यात आधी मखाना तुपात चांगले तळून घ्या. यानंतर थोडं तूप घालून यात गूळ वितळून घ्या. आता मंद आचेवर ठेवलेल्या या मिश्रणात तळलेला मखाना घाला आणि गॅस बंद करा. व्यवस्थित मिसळून मखाना एका भांड्यात काढून थंड करा. साधारण ७ दिवस हे मखाना व्यवस्थित टिकतील. याचे दररोज सेवन करणे फायदेशीर आहे.
० गूळ- मखाना खाण्याचे फायदे:-
वरील फायदे अनुभवण्यासाठी गूळ मखान्याचे सेवन जरूर करा. कारण निरोगी आरोग्य हि आपली प्राथमिक जबाबदारी आहे.