भाग 2 : ‘इटिंग डिसॉर्डर’ होण्याची कारणे आणि प्रमुख लक्षणे कोणती?; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। गेल्यावेळी भाग १ मध्ये आपण इटिंग डिसऑर्डर म्हणजे काय? आणि त्याचे प्रकार जाणून घेतले. यानंतर आता भाग २ मध्ये आपण इटिंग डिसऑर्डर होण्याची कारणे आणि त्यासह प्रमुख लक्षणे जाणून घेणार आहोत. त्यामुळे उगाच पसारा न मांडता आपण थेट मुद्देसूद विषयाकडे वळूयात.
इटिंग डिसऑर्डर होण्याची कारणे कोणती?
इटिंग डिसऑर्डरचे आतापर्यंत कोणतेही एक असे कारण सिद्ध झालेले नाही. मात्र तज्ञ सांगतात कि, खाण्यापिण्याची विकृती विविध घटकांच्या मिश्र संयोजनामुळे होऊ शकते. या घटकांमध्ये सामाजिक, मानसिक आणि जैविक घटकांचा समावेश आहे. अनेकवेळा काही किरकोळ कारणांमुळेही हा विकार होतो. जसे कि, जबाबदारी वाढण्याची भीती, अति प्रेम व अति विश्वास करणे, कुटुंबातील सदस्यांसोबत संवादाचा अभाव इत्यादी. कारण खाण्याचा विकार झालेल्या लोकांमध्ये विविध समस्येचे प्रमाण दिसून येते.
चला तर जाणून घेऊ या घटकांविषयी खालीलप्रमाणे:-
१. सामाजिक फॅक्टर
- मीडिया वा जाहिरातींचा प्रभाव (आदर्श शरीरयष्टीबाबत सतत चिंताग्रस्त, आग्रही)
- विशिष्ट पद्धतीनेच वागण्याचा दबाव
- नृत्य, मॉडेलिंग, जिम्नॅस्टिक आणि एलिट स्पोर्ट्स यांच्याप्रमाणे वागण्याचा दबाव
- जीवनात अचानक मोठे बदल होणे. (उदा. नातेसंबंध तुटणे, ब्रेकअप, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू)
२. मानसिक फैक्टर
- स्वतःच्या शरीराबद्दल नकारात्मक विचार
- आत्मसन्मानाचा अभाव असणे
- प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण आणि सक्रिय होण्यासाठी प्रयत्नशील राहणे
- नैराश्याला आहारी जाणे
- सतत लहान सहन गोष्टींची अति काळजी करणे
- प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीवर राग व्यक्त करणे
- भावना व्यक्त करण्यात अडचण येणे
३. जैविक फैक्टर
- कधीकधी खाण्याच्या विकाराची समस्या जैविक कारणांमुळे देखील असू शकते. या कारणांमध्ये प्रामुख्याने खालील गोष्टींचा समावेश होतो. जसे पौगंडावस्था आणि त्या वयात होणा-या बदलांमुळे, अनुवांशिक वा कौटुंबिक कारणांमुळे.
इटिंग डिसऑर्डरची लक्षणे
खाण्याचा विकार असलेल्या रुग्णांमध्ये काही सामान्य तर काही गंभीर स्वरूपाची लक्षणे आढळतात. जर एखाद्या व्यक्तीमध्ये खाली सांगितलेल्या लक्षणांपैकी ५ पेक्षा जास्त लक्षणे दिसून आली तर त्या व्यक्तीला एकतर खाण्याचा विकार आहे वा तो त्या मार्गावर आहे हे समजावे.
> खाण्याच्या विकाराची लक्षणे:
- वजन कमी होणे, वाढणे वा झपाटयाने वजन वाढणे
- आपल्या दिसण्याकडे आणि वजनावर काटेकोर लक्ष देणे
- साधी सर्दी झाली तरी संवेदनशील होणे
- अचानक बेशुद्ध होणे, शारीरिक थकवा येणे आणि चक्कर येणे.
- कोणत्याही गोष्टीवर मूड स्विंग आणि चिडचिड होणे
- लोकांपासून, समाजापासून सातत्याने दूर राहणे
- कुठल्याही गोष्टीचा सतत विचार आणि सोबत चिंता तसेच नैराश्य अनुभवणे
- तर्कशुद्धपणे विचार करण्यात वा एकाग्रतेत, ध्यान करण्यात अडचण येणे. लक्ष विचलित होणे.
- इतरांसाठी स्वयंपाक करण्यात एकदम रस वाढणे.
- अत्याधिक नियमांचे पालन करणे, जसे की विशिष्ट ग्लासमध्येच पाणी पिण्याचा हट्ट वा आग्रह करणे.
- लपून छपून, गुपचूप कुणालाही न सांगता खाणे वा जेवण करणे.
- बॅगी कपडे घालणे वा आपली ड्रेसिंग स्टाईल बदलणे.
- खूप वेळा किंवा वारंवार व्यायाम पद्धती बदलणे.
- सामुहीक आणि सामाजिक कार्यक्रमांपासून दूर राहणे
- मी तर खातच नाही म्हणून बहाणा करणे.
- जेवणानंतर अनेक वेळा बाथरूममध्ये जाणे
- उशीरा आणि प्रमाणापेक्षा जास्त आहार घेणे
- आपल्या शरीरयष्टीला घेऊन असमाधानी असणे. सोबत डायटिंग आणि डिप्रेशन स्वतःहून ओढवून घेणे.