Deltacron
| |

डेल्टाक्रॉनची हातपाय पसरण्यास सुरुवात, कशी घ्याल काळजी?; जाणून घ्या लक्षणे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या जगभरात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे सगळे निर्धास्त झाले आहेत. पण आता सगळं काही सुरळीत होत आहे असे दिसताना WHO कडून मोठी चिंतेची बाब व्यक्त करण्यात आली आहे. चिंतेची बाब अशी कि, कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या डेल्टाक्रॉनमुळे अनेक शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. डेल्टाक्रॉन हा कोरोनाचा असा प्रकार आहे जो डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरियंटपासून बनला असल्याचे सांगण्यात येत आहे.

WHO’च्या अहवालानुसार, डेल्टाक्रॉनची काही प्रकरणे काही युरोपियन देशांमध्ये, फ्रान्स, नेदरलँड्स आणि डेन्मार्कमध्ये नोंदवली गेली आहेत. या प्रकाराची फारच कमी प्रकरणे आतापर्यंत पाहिली गेली आहेत, त्यामुळे शास्त्रज्ञांना या नवीन प्रकाराबद्दल पुरेशी माहिती नाही.

WHO’चे तांत्रिक प्रमुख म्हणाले की, या नवीन प्रकाराच्या तीव्रतेत आम्हाला कोणताही बदल जाणवलेला नाही. पण हा किती धोकादायक आणि संसर्गजन्य आहे हे कळण्यासाठी आम्ही अभ्यास करत आहोत. प्राण्यांना या विषाणूची लागण झपाट्याने होत आहे. त्यामुळे मानवही या विषाणूच्या संपर्कात येऊ शकतो. या विषाणूचे अहवाल प्रथम जानेवारी २०२२ मध्ये समोर आले होते.

० डेल्टाक्रॉनची लक्षणे –

– ताप
– कफ
– वासाची क्षमता कमी होणे
– सर्दी
– थकवा जाणवणे
– डोकेदुखी
– श्वासोच्छवासाची समस्या
– स्नायू किंवा शरीरात वेदना
– घसा खवखवणे

० ‘डेल्टाक्रॉन’च्या प्रतिबंधासाठी काय कराल?

डेल्टाक्रॉन या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सगळ्यात महत्वाचे म्हणजे कोविड नियमांचे पालन करा. यामुळे हा विषाणू विकसित होण्याची आणि वाढण्याची शक्यता कमी होईल. म्हणून मास्क घाला, सामाजिक आणि सुरक्षित अंतर राखा, सतत तोंडाला हात लावू नका आणि हाताच्या स्वच्छतेची काळजी घ्या.