मजबूत हाडांसाठी आहारात खा ‘हे’ पदार्थ; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। प्रत्येक माणसाला वाढत्या वयानुसार येणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींना सामोरे जावेच लागते. त्यामुळे वाढत्या वयानुसार येणाऱ्या आजारांसाठी आधीच तयार राहणे खूप गरजेचे आहे. प्रामुख्याने वाढत्या वयात होणारे आजार म्हणजे, दृष्टिदोष, सांधेदुखी, हाडांचे दुखणे, निद्रानाश. अशा प्रत्येक समस्येतून आपल्याला जावे लागते. पण जर आजारांना सामोरे जाण्याआधी तर प्रतिबंध वा उपाय शोधून ठेवलात तर आजाराचा त्रास जरा कमी होऊ शकतो.
तसे पाहता आजकाल अंगदुखी म्हणा किंवा सांधेदुखी या समस्या अगदी सर्रास तरुणांमध्येही दिसून येत आहेत. मग अशावेळी हाडांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे हे निदर्शनास येते. कारण तुमची हाडे किती मजबूत असतील हे तुमची दिनचर्या ठरवते.
रोजचा आहार, झोप आणि व्यायाम यावर शारीरिक आणि अगदी मानसिक स्वास्थ्य अवलंबून असते. त्यामुळे या बाबींकडे दुर्लक्ष करू नये. दरम्यान आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास हे पदार्थ तुमच्या हाडांचे दुखणे दूर करू शकतात. तसेच वाढत्या वयात दुखणे वाढू देणार नाहीत.