हाय बीपीचा त्रास असेल तर ‘हे’ व्यायाम करणे टाळा; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो हे आपण सारेच जाणतो. यामुळे आजकाल अनेक लोक विविध आजारांनी त्रासलेले दिसतात. यात प्रामुख्याने मधुमेह, पोटाचे विकार, हृदय रोग, किडनी रोग आणि रक्तदाबाशी संबंधित त्रास असणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यात असे रुग्ण जर फिटनेस फ्रिक असतील तर ते व्यायाम अगदी काटेकोरपणे नियमित करत असतील.
पण मित्रांनो तुम्हाला माहित आहे का..? ज्या लोकांना हाय बीपीचा त्रास असतो त्यांनी काही मोजकेच व्यायाम करायचे असतात. तर काही प्रकारचे व्यायाम करणं त्यांनी टाळायला हवं. अन्यथा, त्यांच्या हृदयावर अतिरिक्त ताण येतो आणि अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. म्हणूनच आज आपण उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी कोणते व्यायाम करू नयेत हे जाणून घेणार आहोत. सोबतच कोणते व्यायाम करावे हेदेखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
० उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी खालील व्यायाम करू नये
- वजन उचलणे,
- धावणे,
- स्कूबा डायव्हिंग,
- स्काय डायव्हिंग,
- स्क्वॅश,
- अधिक काळ जिम करणे.
० काय होतात परिणाम..?
यापैकी कोणताही व्यायाम अशा रुग्णांनी केल्यास हृदयविकाराचा झटका, मूत्रपिंड निकामी होणं, पक्षाघात आणि अंधत्व येण्याचा धोका वाढतो. या व्यतिरिक्त कोणताही व्यायाम करताना, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना डोकेदुखी, वेदना, अति थकवा किंवा उलट्या होत असल्यास त्यांनी व्यायाम ताबडतोब थांबवावा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
० उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी खालील व्यायाम फायदेशीर
- चालणे
- जॉगिंग
- दोरीवरच्या उड्या
- एरोबिक्स व्यायाम
- टॅनिंग
- नृत्य आदी.
० उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी व्यायाम करताना या गोष्टींची काळजी घ्या
- संथ गतीने व्यायाम सुरू करा.
- बीपी वाढल्यास हळूहळू व्यायाम थांबवा.
- तुमच्या शरीराकडे नीट लक्ष द्या.
- ओझं उचलण्यासारखी कामं आणि अति प्रमाणात व्यायाम करू नका.
- जास्त वेळ व्यायाम करू नका.