महिन्याचे ते 5 दिवस अत्यंत वेदनादायी..; जाणून घ्या कारण आणि उपाय
हॅलो आरोग्य ऑनलाईन। प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात मासिक पाळीचा काळ हा अत्यंत महत्वाचा मानला जातो. मासिक पाळी हा एक धर्म आहे. ज्याच्या वेदना अतिशय असह्य करणाऱ्या असल्या तरीही महिला निमूटपणे सहन करतात आणि त्याच कारण म्हणजे मातृत्व. प्रत्येक महिन्यातील ते ५ दिवस महिलांसाठी अत्यंत त्रासदायक असतात. अगदी पाळी येण्याच्या आधीचा काही काळ, पाळी असतानाचा काळ आणि पाळी सरल्यानंतरचा काळ हा तीव्र वेदनांनी भरलेला असतो. दरम्यान महिलांना पोटात दुखणे, शारीरिक थकवा येणे, कंबर दुखणे आणि पाय जड होणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागते.
साधारणपणे ऐकताना किंवा वाचताना हा त्रास फार साधा सरळ वाटतो पण मुळात तो सहन करणाऱ्या महिलांनाच ठाऊक कि त्या काय सहन करत आहेत. हंस काळात ऑफिस म्हणाला किंवा घरचे काम करताना अगदी नकोनको होत. वेदनांसह संपूर्ण दिवस काढणे जणू कठीण होऊ लागते. म्हणून आज आम्ही तुमच्या जवळच्या तिच्यासाठी हा खास लेख घेऊन आलो आहोत. आज आपण या वेदनांमागील कारण जाणून घेणार आहोत. सोबतच यावर काय उपाय करता येईल तेदेखील जाणून घेऊ.
० मासिक पाळीच्या वेदनांचे कारण …
हार्मोन्समध्ये होणारे तीव्र बदल, मानसिक ताण, शरीराची अधिक हालचाल यांमुळे मासिक पाळीच्या वेदना कमी जास्त होतात. इतकेच नाही तर वयानुसारही वेदनांचे स्वरुप बदलत जाते. काहीवेळा गर्भाशयाशी निगडित तक्रारी असल्यामुळेदेखील वेदना कमी जास्त होतात.
० मासिक पाळीच्या वेदनांवर उपाय …
१) संतुलित आहार –
मासिक पाळीच्या वेदना कमी होण्यासाठी आपला आहार संतुलित असेल याची काळजी घ्या. त्यामुळे सतत जंक फूड, मसालेदार पदार्थ, मैदा यांचे सेवन करू नये. यामुळे मासिक पाळीच्या दरम्यान वेदना जास्त होण्याची शक्यता असते. म्हणून आहारात सुकामेवा, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, भाज्या, डाळी, कडधान्ये, फळे या सगळ्या गोष्टींचा आहारात योग्य प्रमाणात समावेश करा. यासह केळं, सी व्हिटॅमिन असलेले लिंबू, संत्री हि फळेदेखील खावी. पण मीठ, चॉकलेट, कॉफी या गोष्टींचे सेवन मासिक पाळीच्या काळात कमी करावे. नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात पाणी प्यावे.
२) घरगुती उपाय –
मासिक पाळीच्या तीव्र वेदनांवर परिणामकारक असे घरगुती उपायांचा अवलंब करावा. इतर कोणत्याही औषधांपेक्षा नक्कीच घरगुती उपाय परिणामकारक आहे. यासाठी १ चमचा जीरे, १ चमचा ओवा, १ चमचा काळे मीठ, चिमूटभर हिंग आणि १/२ चमचा बडिशेप पाण्यात घाला. हे पाणी दिवसातून २ वेळा प्या. यामुळे मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळतो.
३) गरम पाण्याचा शेक –
मासिक पाळीच्या दिवसात स्नायू आकुंचन प्रसरण पावत असल्याने वेदना होतात. अशावेळी स्नायूंना थोडा आराम दिला तर हे दुखणे कमी होते. यासाठी गरम पाण्याची पिशवी, गरम लोखंडी तवा, पोट आणि पाठीवर गरम पाण्याचा शेक घेणे असे उपाय अतिशय उपयुक्त ठरतात. त्यामुळे पाळी येण्याच्या आधी आणि पाळीतही असा शेक घेतल्यास वेदना कमी होतात.
४) योगा –
योगा केल्यामुळे शरीराची योग्य पद्धतीने हालचाल होते. ज्यामुळे पाळीचा फार त्रास होत नाही. त्यामुळे पाळीच्या काळात चंद्र नमस्कार, वर्जासन, सुप्तबद्ध कोनासन, बटरफ्लाय पोज यांसारखी आसने नियमित करावी. यामुळे कंबर आणि पोटाच्या आजुबाजूचे स्नायू लवचिक होतात. परिणामी वेदना कमी होतात.