Radish
| | |

पांढरा शुभ्र मुळा खा आणि विविध आजारांपासून सुटका मिळवा; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मित्रांनो आहारात सॅलड असणे कधीही फायदेशीर. कारण यात आपण कच्च्या भाज्या खातो ज्यामधून आपल्या शरीराला अनेक फायदेशीर तत्त्व मिळतात. यामध्ये समाविष्ट असणारा मुळा बऱ्याच लोकांना आवडत नाही म्हणून टाळला जातो. पण मुळ्यातून मिळणारे पोषक घटक आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. आपल्या दैनंदिन जीवनात आपण मुळ्याची कोशिंबीर, मुळ्याची भाजी, मुळ्याचे पराठे असे पदार्थ खात असतो. ज्याच्या सहाय्याने अगदी लहान मुलेसुद्धा मुळा अगदी आवडीने खातात.

० मुळा आरोग्यासाठी फायदेशीर का आहे..?

मुळ्यामध्ये शरीराला आवश्यक असणारी सर्व पोषक तत्व समाविष्ट आहेत. यामध्ये पाणी, एनर्जी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर, टोटल डएटरी, साखर, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, पोटॅशियम, सोडियम, जिंक, कॉपर, मँगनीज, फ्लोराईड या सर्व मिनरल्सचा समावेश आहे शिवाय विटामिन सी, थियामिन, नियासिन, कॉलीन, बीटा, विटामिन ए आययू, विटामिन के, ल्यूटिन असे सर्व पोषणदायी घटक आहेत.

Radish

० मुळ्याचे आरोग्यदायी फायदे

१) हृदय निरोगी राहील
आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाचा भाग आपले हृदय असते आणि त्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण मुळ्यामध्ये असलेले नायट्रेट एथरोस्क्लेरोसिसच्या त्रासापासून सुटका देते.

Heart Care

एथरोस्क्लेरोसिस हि एक गंभीर समस्या आहे. ज्यामध्ये चरबी आणि कोलेस्ट्रॉल साठते. ज्यामुळे हार्ट अटॅक येतो. पण मुळ्यात असणारे फायबर ही समस्या कमी करण्यास मदत करते. त्यामुळे नियमित आहारामध्ये मुळ्याची भाजी जरूर खा.

Diabetes

२) मधुमेहींसाठी लाभदायी
मधुमेही व्यक्तींसाठी मुळा खाणे फायदेशीर आहे. मुळा हा अँटि- डायबेटिक स्वरूपात काम करतो. यातील अँटिऑक्सिडंट्स आणि एनर्जी मेटाबॉलिज्म चांगली करतात. शिवाय फ्री रॅडिकल्सपासून बचाव करतात. सोबतच ग्लुकोज नियंत्रित करते. ज्यामुळे मुळाच नाही तर मुळ्याची पाने आणि मुळ्याच्या बियादेखील मधुमेही व्यक्तींना फायदेशीर ठरतात. मुळ्यातील विटामिन सी हे इन्शुलिनवर अधिक प्रभावी काम करते.

Stomach Pain

३) बद्धकोष्ठतेवर गुणकारी
मुळ्यामध्ये उच्च फायबर असतात. त्यामुळे दररोज मुळा खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. कारण आतडी साफ करण्यासाठी फायबर मदत करते. म्हणूनच मुळा खाण्याचा फायदा बद्धकोष्ठतेवर गुणकारी ठरतो. याशिवाय फायबरयुक्त पदार्थांनी मलप्रक्रिया अधिक सोपी होते. ज्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते.

Kidney Stone

४) मुतखड्यापासून सुटका
मुतखड्याची समस्या त्रासदायक असते. यासाठी मुळ्यातील कॅल्शियम ऑक्सालेट मदत करतात. हे मुतखडा शरीरातून बाहेर काढतात. त्यामुळे मुतखड्यापासून वाचायचं असेल तर मुळ्याचे सेवन डॉक्टरांशी सल्लामसलत करून करा.

Weight Loss

५) वजन कमी होईल
वजन कमी करण्यासाठी मुळ्यातील फायबर मदत करते. मुळ्यातून मिळणारे फायबर पोट भरते. त्यामुळे जास्त भूक लागत नाही आणि जाडी वाढण्याचा प्रश्नही येत नाही. तसेच तुम्ही डाएट करत असाल तर त्यामध्ये मुळा जरूर खा. यामुळे कॅलरी कमी होण्यास मदत मिळते.

Skin

६) त्वचेसाठी फायदेशीर
मुळ्यातील विटामिन सी त्वचेसाठी अँटिऑक्सिडंटप्रमाणे काम करते. हे विटामिन सी त्वचेवरील कोलेजन वाढवून त्वचेवर चमक आणण्याचे काम करते. त्यामुळे मुळ्याचा उपयोग त्वचेचे आरोग्य राखण्यासाठीही होतो.