भाग 1 : ‘ॲलोपेशिया’ म्हणजे काय..?; जाणून घ्या कारणे आणि लक्षणे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। ॲलोपेशिया हा एक विकार आहे. सर्व सामान्य भाषेत याची उकल करून सांगायचं म्हटलं तर, ॲलोपेशिया हा एक अशा प्रकारचा आजार आहे ज्यामध्ये केसगळती होते आणि एक प्रकारचं टक्कल पडतं. मराठीमध्ये याला ‘चाई पडणं’ असं म्हणतात. या आजारामध्ये शरीरात दीर्घकाळ दाह टिकून राहतो आणि याचा परिणाम केसांच्या मुळांवर होतो. परिणामी केसांच्या समस्या वाढतात. यातील मुख्य समस्या म्हणजे केसगळती.
या विकारामध्ये कधीकधी ठराविक भागातले सर्व केस गळून जातात आणि त्या ठिकाणी छोटे गोलाकार पॅचेस तयार होतात. याला ‘ॲलोपेशिया ॲरियाटा’ असे म्हणतात. तज्ञांच्या रिपोर्टनुसार, सर्व साधारणपणे २० ते ४० वयोगटाच्या तरुणांमध्ये हा विकार जास्त आढळून येत आहे. कधी कधी संपूर्ण टाळूवरचे केस गळतात. याला ‘ॲलोपेशिया टोटॅलिस’ असं नाव आहे.
ॲलोपेशिया विकाराची कारणे
ॲलोपेशिया या विकाराचं एक असं निश्चित कारण नाही. तर हा विकार होण्यामागे विविध घटक जबाबदार आहेत. यामध्ये मुख्य करून कोणत्या कारणांचा समावेश आहे हे आपण जाणून घेऊया खालीलप्रमाणे:-
१) ॲलोपेशिया होण्यामागे अनुवंशिकतेचा वाटा मोठा आहे. म्हणजेच कौटुंबिक इतिहासामुळे हा विकार होऊ शकतो. तुमच्या आधी जर कुणाला हा विकार होऊन गेला असेल तर म्हणून तुम्हाला हा विकार झाला असू शकतो.
२) ॲलोपेशिया विकार होण्यामागे आणखी एक महत्वाचा घटक असू शकतो आणि तो म्हणजे मानसिक ताणतणाव. यामध्ये मेंदूपर्यंत रक्ताचा योग्य पुरवठा होत नाही. साहजिकच डोक्यापर्यंतचा रक्तप्रवाह सुरळीत नसल्यामुळे हा विकार होतो. पण याचा अर्थ असा नाही, की ताणतणाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीला हा त्रास होतो.
३) ॲलोपेशिया होण्यामागे आणखी एक महत्वाचा घटक समाविष्ट आहे आणि तो म्हणजे ऑटोइम्युन प्रतिसाद. यामध्ये व्यक्तीची प्रतिकार यंत्रणा म्हणजेच इम्युन सिस्टीम केसांच्या मुळांना बाह्य घटक वा फॉरेन बॉडी समजून त्यांच्यावर हल्ला करते. यामध्ये केसांच्या मुळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. यामध्ये केस गळती वाढते.
४) ॲलोपेशिया होण्यामागे आपली जीवनशैली कारणीभूत असू शकते. अनियमित आहार, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव, केसांची निगा राखण्यासाठी वेळ न देणे यामुळेदेखील हा विकार होऊ शकतो.
ॲलोपेशिया’ची लक्षणे
आज भाग १ मध्ये आपण ॲलोपेशिया म्हणजे काय, त्याची लक्षणे आणि कारणे कोणती हे जाणून घेतले. यानंतर भाग २ मध्ये आपण ॲलोपेशिया या विकरावर कोणते उपचार करता येतात हे जाणून घेऊ.