भाग 2 : लवंग खाल्ल्याने मोठे मोठे आजार जातील पळून; जाणून घ्या फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। लवंगेतील अँटि मायक्रोबायल आणि अँटि ऑक्सिडंट्सचा विविध रोगांवर अधिक प्रभाव पडतो. याशिवाय लवंगेतील अँटिव्हायरल आणि एनाल्जेसिक घटकांचाही शरीराला चांगला फायदा होतो. त्यामुळे आयुर्वेदात लवंगेचे विशेष स्थान आहे.
म्हणून आपण भाग १ मध्ये आयुर्वेदानुसार लवंग आरोग्यासाठी कशी आणि का फायदेशीर असते हे जाणून घेतले. यानंतर आता आज भाग २ मध्ये आपण लवंग खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.
० लवंग खाण्याचे फायदे
१) तोंडाचे आरोग्य –
लवंग खाल्ल्याने तोंडाचे आरोग्य व्यवस्थित राखले जाते. कारण लवंग तोंडात निर्माण होणारे सूक्ष्म जीव कमी करते. तसेच दाताच्या आणि प्रभावी आहे. याशिवाय तोंडातील दुर्गंधी कमी करण्यासाठीदेखील लवंग अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे हिरड्यांचे दुखणे, दातदुखी, तोंडाची दुर्गंधी यापासून दूर राहायचं असेल तर दिवसातून एक तरी लवंग खा.
२) मधुमेहापासून संरक्षण –
रक्तातील ग्लुकोज कमी करून लवंग मधुमेह नियंत्रित करते. शिवाय लवंगमध्ये असणारे अँटि हायपरग्लायसेमिक, हायपोलिपिडेमिक आणि हेपेटोप्रोटेक्टिव्ह गुण मधुमेहाची समस्या कमी करण्यासह लिपिडमध्ये सुधारणा आणतात. यामुळे यकृतदेखील व्यवस्थित राहते.
३) पचनतंत्र सुरक्षा –
लवंग शरीरातील एंजाइम्सना उत्तेजित करते. यामुळे पचनक्रिया सुरळीत चालते. तसेच लवंग पोट फुगणे, गॅस होणे, अपचन, मळमळ, डायरिया आणि उलटी यासारख्या त्रासांपासून सुटका देते. शिवाय पेप्टिक अल्सरच्या लक्षणांनाही कमी करते.
४) सर्दी खोकला दूर –
लवंगेतील अँटिइन्फ्लेमेटरी गूण सर्दी आणि खोकला कमी करण्यासाठी मदत करतात. वास्तविक एक्सपक्टोरेंटप्रमाणे लवंग काम करते जे आतील बरगड्यांपासून तोंडापर्यंत श्वसन तंत्र स्वच्छ करते. त्यामुळे लवंग घालून काढा तयार करा आणि तो प्या. यामुळे लवकर सर्दी खोकला दूर पळून जातो आणि आराम मिळतो.
५) डोकेदुखी आणि दातदुखीपासून सुटका –
दातदुखी असो वा डोकेदुखी यावर लवंग फायदेशीर उपाय आहे. कारण लवंगेमध्ये एनाल्जेसिक गुण असतात, जे दात आणि डोकेदुखीच्या समस्येपासून सुटका मिळवून देतात.
६) तणाव कमी होईल –
लवंगमध्ये अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म असतात जे तणाव कमी करतात. शिवाय यातील अँटिस्ट्रेस अॅक्टिव्हिटी तणाव कमी करून शारीरिक थकवा देखील कमी करतात. यामुळे अनिद्रा, स्मृतीहानी, चिंता कमी होते.
७) कॅन्सरसाठी लाभदायी – लवंगमध्ये एथिल एसिटेट अर्क असतो ज्यात अँटिट्यूमर गुण आढळतात. यामुळे कॅन्सरची जोखीम कमी करण्यास मदत मिळते. रिसर्चमध्ये सांगितल्याप्रमाणे ओलिक अॅसिड असल्यामुळे लवंग अँटिट्यूमरने प्रभावित आहे. तसंच यावर अधिक अभ्यास चालू आहे.
८) दम्यासाठी लवंग प्रभावी –
लवंगमध्ये असलेले युजेनॉल दम्यावर प्रभावी आहे. हा घटक अँटिअस्थमेटिक असून दम्याने त्रस्त असलेल्या लोकांना याची मदत मिळते. यामधील ब्रोन्कोडायलेटर आणि इम्यनोमॉड्युलेटरी गुणांमुळे अँटिअस्थेमेटिक ड्रगप्रमाणे क्षमतेमुळे दम्याच्या लोकांना फायदा मिळतो.
९) वजन कमी होईल –
लवंगेत अँटिओबेसिटी गुणधर्म असतात. जे चरबी नियंत्रणात ठेवतात. त्यामुळे शरीरावर अतिरिक्त चरबीचे प्रमाण वाढल्यास लवंगचे सेवन करणे फायदेशीर आहे.
१०) अॅक्नेवर परिणामकारक –
त्वचेवर येणारे अॅक्ने आणि मुरूमांना कमी करण्यासाठी लवंग मदत करते. यामध्ये इन्फ्लेमेटरी कमी करणारे गुण आढळतात. अर्थात बॅक्टेरियामुळे होणारे अॅक्ने कमी करण्यासाठी लवंग उपयुक्त ठरते. यामुळे तुम्हाला त्वचेवर इन्फेक्शन होत असेल तर लवंगेचा फायदा होतो.