मोमोज अगदी आवडीने खाताय..? तर आताच सावध व्हा; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल बाजारात विविध चायनीज पदार्थ इंडियन टच देऊन विक्रीसाठी ठेवले जातात. याआधी फक्त चायनीज भेळ, मंचुरियन, फ्राईड राईस असे पदार्थ लोकप्रिय होते. पण आजकाल मोमोज हा पदार्थ देखील चांगलाच लोकप्रियता गाठताना दिसतोय. फक्त मोमोज बनविणारे अनेक शॉप्स सुरु झाले आहेत आणि लोकदेखी अगदी आवडीने हे मोमोज खातात. तुम्हीही खाता का..? तर हि बातमी तुमच्यासाठी आहे असच समजा.
कारण जे चवीला रुचकर असतं ते आरोग्यदायी असेलच असं काही नाही. मोमोज चवीला उत्कृष्ट आणि दिसायला आकर्षक असल्यामुळे लहान मुलांमध्ये या पदार्थांचे फार क्रेझ आहे. पण हा पदार्थ लहान मुलांच्या आणि अगदी तुमच्याही तब्येतीसाठी बरा नाही. का..? ते जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
० मोमोज खाणे हानिकारक..
कारण मोमोज हा पदार्थ मैद्याच्या सहाय्याने बनवला जातो. जो परिष्कृत तंत्रज्ञानाद्वारे गव्हाच्या पिठापासून तयार केला जातो. हा गव्हाचाच पिष्टमय भाग आहे. ज्यामध्ये गव्हाचा उच्च फायबर भाग काढून टाकला जातो आणि वेगळा केला जातो. यामुळे तो खाण्याच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक मानला जातो.
० मोमोज खाण्याचे तोटे
अलीकडच्या काळात मोमोज हा स्ट्रीट फूडचा राजा झाला आहे. त्याची चव कमाल आणि किंमत अगदीच स्वस्त. यामुळे भारतीय स्ट्रीट फूड इंडस्ट्रीमध्ये याचा सहज प्रवेश झाला. पण हा स्वस्त आणि मस्त वाटणारा पदार्थ आरोग्याचे नुकसान करतोय हे कुणाच्याच लक्षात येत नाही. जाणून घ्या मोमोज खाल्ल्याने आरोग्याचे काय नुकसान होते ते खालीलप्रमाणे:-
मोमोज बनविण्यासाठी तयार केलेल्या सारणात वापरलेल्या भाज्या आणि सॉस निकृष्ट दर्जाचे असल्यास पोटाच्या विविध आजारांचा सामना करावा लागू शकतो.
मोमोज बनवण्यासाठी मैदा वापरला जातो, जो परिष्कृत तंत्रज्ञानाद्वारे गव्हाच्या पिठापासून तयार केला जातो. हा गव्हाचाच पिष्टमय भाग असला तरीही यातील उच्च फायबर काढून टाकलेले असते. ज्यामुळे शरीरातील आंतर क्रियांच्या कार्यावर याचा परिणाम होतो.
मोमोज बनविण्यासाठी वापरले जाणारे पिठ अॅझोडीकार्बोनमाइड, क्लोरीनाझिन, बेंझॉयल पेरोक्साइड किंवा इतर कोणत्याही रसायनाने ब्लीच केले जाते. या रसायनांमध्ये काही हानिकारक घटक असतात, जे पीठाला मऊ आणि स्वच्छ पोत देण्याचे काम करतात, ते पिठात मोठ्या प्रमाणात राहतात. जे आपल्या शरीरात गेल्यावर स्वादुपिंडाला खूप नुकसान पोहोचवतात.
तसेच मोमोज बनविण्यासाठी वापरण्यात आलेल्या सॉसेस मध्ये विविध रसायनांचा प्रभाव असतो. या रसायनांच्या प्रभावामुळे स्वादुपिंडाच्या इन्सुलिनच्या उत्पादनावर नकारात्मक परिणाम होतो. ही रसायने इन्सुलिनवर अवलंबून असलेल्या मधुमेहाचेही कारण होतात.
याशिवाय मोमोजमध्ये घातक कोलिफॉर्मचे प्रमाण खूप जास्त आहे. असे स्ट्रीट फूड खाल्ल्याने अतिसार, टायफॉइड, पोटदुखी आणि अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो.
० मग मोमोज खायचेच नाहीत का..?
तर मित्रांनो.. एव्हढं सगळं जाणून घेतल्यानंतर मोमोज खायचेच नाहीत का..? असा सवाल पडणे फारच साहजिक आहे. पण मोमोज बाहेरून आणून किंवा बाहेर खाण्याऐवजी घरात बनविले तर ते आरोग्यदायी मानता येतील आणि मनसोक्त खाताही येतील. कारण मोमोज ही वाईट गोष्ट आहे असे नाही.
परंतु बनविणाऱ्याने कोणत्या प्रकारचे मसाले आणि तंत्र वापरले आहे यावर त्याचा फायदा वा तोटा अवलंबून असतो. त्यामुळे घरच्याघरी मिश्र पीठे आणि उत्तम भाज्यांचे संयोजन करून मोमोज बनवा आणि कुटुंबासोबत मजेत खा.