Curd Benefits थंडगार फिलिंगसाठी उन्हाळ्यात रोज दही खा; जाणून घ्या फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या कडाक्याच्या उन्हाचे दिवस सुरु आहेत. अशा दिवसांमध्ये शरीरातील पाण्याची पातळी खूप भरभर कमी होते. परिणामी डिहायड्रेशनची समस्या आणि त्वचेचे नुकसान होते. याशिवाय आरोग्यविषयक इतर तक्रारी देखील जाणवतात. यात विशेष करून शरीराचे तापमान वाढण्याच्या समस्येमुळे आंतरक्रियांमध्ये बिघाड होतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडगार वाटेल अशा गोष्टींची गरज असते.
यामध्ये दही हा अतिशय उत्तम पर्याय आहे. याचे कारण म्हणजे दही स्वभावाने थंड असल्यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहते. कारण दह्यामधील घटक हे शरीरातील अतिउष्णता कमी करून आरोग्य सुधारण्यास मदत करतात. (Curd Benefits)
दह्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, साखर, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, सोडियम, जस्त, तांबे, सेलेनियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी- 6, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन बी- 2, व्हिटॅमिन बी- 12, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यासारखे पोषक तत्व समाविष्ट असतात. (Curd Benefits) जे शारीरिक आरोग्यासाठी अतिशय लाभदायक भूमिका बजावतात.
उन्हाळ्यात दही खाण्याचे फायदे (Curd Benefits)
१) मजबूत प्रतिकारशक्ती – दह्यामध्ये असलेले चांगले बॅक्टेरिया शरीरासह. मानसिक आरोग्यदेखील सुधारते. यातील विशेष गुणधर्म प्रतिकारशक्ती मजबूत करतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात रोज दह्याचे सेवन करणे रोगप्रतिकारक शक्तीची काळजी घेण्यासाठी अतिशय महत्वाचे ठरते.
२) सुव्यस्थित पचनक्रिया – दह्यामध्ये असलेले चांगले बॅक्टेरिया पचनसंस्था स्वच्छ करते. ज्यामुळे खाल्लेले अन्न व्यवस्थित पचते. यासाठी दररोज जेवणासोबत १ वाटी दही घेणे फायद्याचे ठरते.
३) मजबूत हाडे – दह्यातील कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडे तसेच दात मजबूत होण्यास मदत करतात. दह्यामध्ये कॅल्शियमची मात्रा भरपूर असल्याने दही हाडांसाठी तसेच दातांसाठी साहजिकच खूप चांगले ठरते.
४) वजनावर नियंत्रण – दह्यामध्ये प्रथिने भरपूर असतात. यातील आवश्यक पोषक घटक शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढून देत नाहीत. त्यामुळे दही वजन कमी करण्यासह सहाय्यक ठरते.
५) त्वचेचा पोत सुधारतो – उन्हाळ्यात प्रामुख्याने आपल्या त्वचेवर गंभीर परिणाम झाल्याचे दिसून येते. अशावेळी दही अत्यंत फायदेशीर भूमिका बजावते. यात दही आपली त्वचा चमकदार आणि गुळगुळीत बनविण्यात मदतयुक्त ठरते. शिवाय दह्यातील व्हिटॅमिन ई आणि झिंक यामुळे त्वचेचा पोत आणि रंग सुधारतो.