Summer Care Tips For Babies उन्हाच्या तीव्रतेपासून बाळाचे करा रक्षण; जाणून घ्या टिप्स
हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या रखरखत्या उन्हाने अक्षरशः जीवाचे हाल केले आहेत. अंगाची लाही लाही होत शरीरातून निघणाऱ्या घामाच्या धारा, घशाला पडणारी कोरड हि स्थिती प्रत्येक उन्हाळ्यात जाणवते. त्यामुळे उन्हाळ्याचे दिवस जसजसे तीव्र होऊ लागतात तसतशी आरोग्याची काळजी घेण्याबाबत सतर्कता वाढणे गरजेचे आहे. सूर्याच्या अतिनील आणि तीव्र किरणांमुळे मानवी शरीराचे आरोग्य खराब होण्याची शक्यता असते. या दिवसात ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांना जास्त त्रास होतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात बाळाची काळजी घेणे जास्त गरजेचे आहे. कारण, लहान बाळांची त्वचा हि अतिशय संवेदनशील असते. Summer Care Tips For Babies
मानवी शरीराच्या त्वचेचे एकूण ७ लेयर असतात. यातील प्रत्येक लेयरचे सूर्याच्या किरणांमुळे हळूहळू नुकसान होत जाते. बाळाची त्वचा हि अतिशय नाजूक आणि संवेदनशील असते. त्वचेच्या ७ लेयर्सपैकी काही लेयरची गुणवत्ता अतिशय साधारण असल्यामुळे बाळाला उन्हाच्या तीव्रतेचा अधिक त्रास होऊ शकतो. यामुळे भर उन्हात बाळाला घेऊन घरातून बाहेर पडत असाल तर काही आवश्यक नियमांचे पालन करणे अतिशय जरुरी आहे. कारण आपले बाळ एका वयापर्यंत पूर्णपणे पालकांवर विसंबून असते. यामुळे बाळाच्या आरोग्याची काळजी घेणे हि आपली प्राथमिक जबाबदारी असणे गरजेचे आहे. Summer Care Tips For Babies
० ‘या’ टिप्सच्या सहाय्याने उन्हापासून बाळाचे रक्षण करा (Summer Care Tips For Babies)
१) त्वचा हायड्रेट ठेवा –
उन्हाळ्यात आपले शरीर हायड्रेटेड राहणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी बाळाच्या शरीराआतून आणि शरीराच्या बाहेरून देखील त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी एकतर बाळाच्या दैनंदिन रुटीन मध्ये त्याला आवश्यक तितके पाणी पाजा.
तसेच बाळाला आंघोळ घातल्यानंतर त्यांची सौम्य त्वचा नाजूकपणे हाताळा आणि हळूवारपणे स्वच्छ मऊ टॉवेलने कोरडी करा. यानंतर त्याच्या सौम्य त्वचेला केमिकल नसलेले मॉइश्चरायझर वापरून हळुवारपणे मालिश करा. सॉफ्टसेन्स मॉइश्चरायझिंग लोशन आणि सॉफ्टसेन्स बेबी क्रीम ही दोन्ही सौम्य, हायपोऍलर्जेनिक उत्पादने आहेत जी उन्हाळ्यात बाळाच्या त्वचेसाठी योग्य आहेत हे लक्षात घ्या.
२) आईचे दूध द्या –
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाळ किमान ६ महिन्याचे होईपर्यंत त्याचा पूरक आहार हा आईचे दूध हाच असतो. त्यामुळे बाळाला बाहेरचे दूध वा पावडर मिल्क देऊ नका.
बाळाचे शरीर आतून हायड्रेट ठेवण्यासाठी बाळ सहा महिन्यांचे होईपर्यंत त्याला वेगळे असे पाणी लागत नाही. आईच्या दुधात पुरेसे पाणी असते आणि ते बाळाची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. फक्त यासाठी तुम्ही स्वतः तुमच्या शरीराला आवश्यक तितके पाणी प्यायला विसरू नका.
३) सुती आणि फिके कपडे –
उन्हाच्या दिवसात लहान मुलांना फॅन्सी आणि रखरखीत कपडे घालू नका. यामुळे एकतर त्वचेचे नुकसान होते आणि दुसरे म्हणजे मुलांना हिट जाणवते. ज्यामुळे मुलं चिडचिड करतात.
या दिवसात लहान मुलांना झब्बा, फ्रॉक, पेटीकोट असे कपडे घाला. हे कपडे सुटू आणि फिक्या रंगाचे असतील याची काळजी घ्या. कारण सुती कपड्यांमध्ये ऑरगॅनिक कापूस हा नेहमीच्या कापसापेक्षा जास्त टिकाऊ असतो आणि त्वचेलाही हलका वाटतो.
४) त्वचेच्या ऍलर्जींकडे लक्ष द्या –
बाळाच्या त्वचेवर जर बारीक पुरळ उठल्याचे दिसले तर दुर्लक्ष करू नका. हि सामान्य बाब नसून ऍलर्जीचे लक्षण आहे.
त्यामुळे त्वचेच्या संसर्गाची चिन्हे दिसली तर लगेच बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या.
५) घरात डायपरचा वापर नको –
अनेक लोक घरातही बाळाला डायपर घालून ठेवतात . ज्यामुळे बाळाच्या त्वचेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे बाळाच्या त्वचेला श्वास घेऊ द्या आणि त्यांना दररोज थोड्या काळासाठी डायपरशिवाय राहू द्या.
याव्यतिरिक्त बाळाला सेंद्रिय कापसाचे कपडे घाला. जे बाळाच्या नाजूक त्वचेसाठी पूर्णपणे बिनविषारी आणि सुरक्षित आहे.
६) सतत अंघोळ नको –
उन्हाळ्यातसुद्धा लहान मुलांना कोमट पाण्यानेच अंघोळ घालावी लागते. कारण थंड पाण्यामुळे मुलांच्या शरीराचे तापमान अचानक कमी होऊ शकते. शिवाय त्यांना सर्दी आणि ताप येऊ शकतो. म्हणून कोमट पाण्याने अंघोळ घाला पण सतत नको.
दिवसभरातून मुलाला ४ वेळा अंघोळ घालत असाल तर त्याऐवजी २ वेळच घाला. कारण यामुळे त्वचा कोरडी होऊन त्यांना त्रास होऊ ष्टो. तसेच मनगटाच्या आतील बाजूने पाण्याचे तापमान तपासा आणि बाळाला अंघोळ घालण्यापूर्वी ते उबदार असल्याची खात्री करून घ्या.
७) हलके घरगुती अन्न –
उन्हाळ्यात तेलकट वा मसालायुक्त पदार्थ खाल्ले असता तुमच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो. तसेच आइस्क्रीम किंवा फिजी ड्रिंक्स थंडाव्यासाठी खाल्ले तरीही बाधतात. तुम्हाला होणार त्रास हा साहजिकच मुलांनाही होऊ शकतो.
कारण स्तनदा माता आपल्या बाळाला दूध पाजताना आपल्या शरीरातून त्याला पोषण देत असतात. मग अशावेळी तुमचा आहार चुकला तर साहजिकच मुलांच्या आरोग्यावर याचा परिणाम होतो. त्यामुळे तुमचा आहार हा घरगुती, सकस, पौष्टिक आणि हलका असेल याकडे लक्ष द्या.