Home Remedies For Headache डोकेदुखी थांबत नाही..? करा ‘हे’ घरगुती उपाय; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। डोकेदुखी (Headache) हि अगदी सर्वसामान्य वाटणारी बाब आहे. पण एकदा का डोकं दुखू लागलं आणि लवकर थांबलं नाही तर जे हाल होतात ते ज्याचं त्यालाच माहित. साधारणपणे बराच वेळ उपाशी राहणे, भर उन्हात फिरणे, पाणी कमी पिणे, विविध औषधांचा अतिरेक या सर्व कारणांमुळे डोकेदुखीचा त्रास संभवतो. शिवाय डोकेदुखी हा काही आजार नाही. पण हि बाब काही गंभीर आजारांचे लक्षण असण्याची शक्यता नाकारताही येत नाही. त्यामुळे आज आपण डोकेदुखीवरील घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. जे अगदी सोप्पे आणि कमी वेळात अधिक आराम देणारे आहेत. (Home Remedies For Headache)
डोकेदुखी हि अशी आरोग्यविषयक समस्या आहे जी कोणत्याही वयाच्या व्यक्तीला कोणत्याही कारणामुळे होऊ शकते. अनेक लोक डोकेदुखीकडे दुर्लक्ष करतात. तर काही जण डोकेदुखीपासून लवकर आराम मिळावा म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवायचं नको नको ती औषधे घेतात. तर मित्रांनो या दोन्ही सवयी आरोग्याच्या दृष्टीने घातक आहेत. कारण यामुळे अनेक गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे डोकेदुखीला हलक्यात घेऊ नका. डोकेदुखीची जी कारणे असतील त्यानुसार घरगुती उपायांची मदत घेऊन आराम मिळावा. त्यातूनही आराम मिळाला नाही तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. (Home Remedies For Headache)
डोकेदुखी कारणे (Causes Of Headache)
डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात. यांपैकी महत्वाची कारणे आपण जाणून घेऊ. तणाव, दात वा हिरड्यांची समस्या, संक्रमण, मांसपेशी दुखावणे, डाएट (चहा अथवा कॉफी पिऊन राहणे, जास्त वेळ काहीही न खाता उपाशी राहणे), डोळ्यांचे दुखणे, हार्मोनल बदल, काही औषधी गोळ्यांचा परिणाम, कानदुखी, नाकातून पाणी येणे वा घशाशी संबंधित कोणतीही समस्या, मान वा डोक्याला दुखापत, उच्च रक्तदाबाचा त्रास. (Home Remedies For Headache)
चुकीच्या पद्धतीने झोपणे, उठणे वा बसणे, दारूचे अतिसेवन, हवामानातील बदल, ध्वनी प्रदूषण, डिहायड्रेशन, ब्रेन ट्यूमर या सर्व कारणांमुळे डोकेदुखी होऊ शकते. यातील काही कारणे साधारण असली तरी काही गंभीर असल्यामुळे डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू नका. यातील साधारण डोकेदुखीवर त्वरित आराम मिळवण्यासाठी करावयाचे घरगुती उपाय जाणून घेऊ.
डोकेदुखीवर घरगुती उपाय
(Home Remedies For Headache)
1. तुळस (Tulsi)
० साहित्य –
एक/ दोन थेंब तुळशीचे तेल, एक/ दोन चमचे अन्य कोणतेही तेल
० वापरण्याची पद्धत –
तुळशीचे तेल अन्य तेलासह मिसळून कपाळापासून मानेपर्यंत लावा आणि हलक्या हाताने मालिश करा. काही तासांटच तुम्हाला डोकेदुखीपासून आराम मिळेल. डोकं जास्त दुखत असेल तर दर १ तासाने हे तेल लावा. याशिवाय तुळशीचा चहादेखील फायदेशीर ठरेल.
० कसे ठरते फायदेशीर..?
तुळशीचे तेल डोकेदुखीपासून सुटका देते. कारण तुळशीमध्ये तणावापासून मुक्त करणारे गुण असतात. जे हलक्या फुलक्या डोकेदुखीपासून सुटका देतात. शिवाय तुळशीचा चहा देखील डोकेदुखीवर परिणामकारक आहे.
2. आले (Ginger)
० साहित्य –
आल्याचे ४ लहान तुकडे, २ कप पाणी
(Home Remedies For Headache)
० वापरण्याची पद्धत –
एका भांड्यात पाणी उकळून त्यात आल्याचे तुकडे टाका आणि त्यावर झाकण ठेवा. नंतर हे पाणी गाळून प्या. एका दिवसात १ ते २ कप हे पाणी प्या. वाटल्यास आल्याच्या पावडरचा वापर करा.
० कसे ठरते फायदेशीर..?
आल्यातील आयुर्वेदिक गुणधर्म डोकेदुखीपासून आराम देते. इतकंच नाही तर आल्याची पावडर सलग ३ ते ४ दिवस चार चार तासांनी थोडी थोडी खाल्लीत तर मायग्रेनचा त्रासही कमी होतो.
3. लवंग (Clove)
० साहित्य –
आवश्यकतेनुसार लवंग, लवंगेचे तेल, बदाम वा नारळाचे तेल
० वापरण्याची पद्धत –
यासाठी लवंग एका रुमालात बांधा आणि डोकं दुखत असल्यास त्याचा थोड्या थोड्या वेळाने वास घ्या. शिवाय १-२ चमचा लवंग तेल हे बदाम वा नारळाच्या तेलात मिसळून डोक्याला लावा. जास्त दुखत असल्यास, काही तासांच्या अंतराने हे मिश्रण सतत कपाळाला लावा आणि मालिश करा.
० कसे ठरते फायदेशीर..?
लवंगेचे तेलात वेदनाशामक गुणधर्म असल्यामुळे ती डोकेदुखीवर उपायकारक आहे. यामुळे अनेक लोक दुधामध्ये मीठ आणि लवंग चिरडून मिसळून पितात. चवीबाबत हे न आवडल्यास लवंग तेलाचा उपयोग करा.
4. थंड पाण्याने मसाज (Cold Massage)
० साहित्य –
बर्फाचे तुकडे वा थंड पाणी, आईस बॅग
० वापरण्याची पद्धत –
उन्हाळ्याच्या दिवसात डोकेदुखीचा त्रास झाल्यास बर्फाचे तुकडे वा थंड पाणी आईस बॅगमध्ये भरा आणि आपल्या डोक्यावर, मानेवर आणि पाठीवर १० ते १५ मिनिट ठेऊन शेकवा. तुमच्याजवळ आईस बॅग नसेल तर कॉटनच्या कपड्याचा वापर करून शेक द्या.
० कसे ठरते फायदेशीर..?
डोकेदुखी थांबत नसेल तर हा उपाय अतिशय फायदेशीर आणि लाभदायी आहे. यामुळे तणाव दूर होतो आणि मांसपेशी खेचल्या गेल्या असतील तर ती समस्यादेखील दूर होऊन आराम मिळतो.
5. पुदीना तेल अर्थात मिंट ऑईल (Mint Oil)
० साहित्य –
१ ते २ थेंब पुदीन्याचे तेल, १ चमचा ऑलिव्ह ऑईल वा नारळाचे तेल
० वापरण्याची पद्धत –
दोन्ही तेल एकमेकांत मिसळून हलक्या हाताने डोक्याला मसाज करा. डोके दुखत असताना थोड्या थोड्या अंतराने या मिश्रणाने डोक्याला मालिश करा.
० कसे ठरते फायदेशीर..?
हे तेल डोक्याला थंडावा देते आणि डोकेदुखीपासून सुटका मिळवून देते. कारण तणावाने डोके दुखत असेल तर त्यावर हा उत्तम उपाय आहे. पुदिन्यामध्ये असणारे मेन्थॉल हे मायग्रेनच्या त्रासापासून सुटका मिळवून देण्यासाठी देखील लाभदायक आहे.
6. रोझमेरी ऑईल (Rosemary Oil)
(Home Remedies For Headache)
० साहित्य –
२ ते ३ थेंब रोझमेरी ऑईल अर्थात गुलाबाचे तेल
० वापरण्याची पद्धत –
डोकेदुखीपासून सुटका मिळविण्यासाठी या तेलाचा एखादा थेंब बोटांवर घेऊन नाकाने सुगंध घ्या. असे अधून मधून केल्यास फायदा होतो.
० कसे ठरते फायदेशीर..?
रोझमेरी तेलामुळे मांसपेशींना आराम मिळतो आणि डोकेदुखीपासून सुटका मिळते. शिवाय निद्रानाशाचा त्रास दूर होतो.
7. लव्हेंडर ऑईल (Lavender Oil)
० साहित्य –
२ चमचे लव्हेंडर एसेन्शियल ऑईल
० वापरण्याची पद्धत –
हे तेल तुम्ही एका स्वच्छ आणि कोरड्या रूमालाला लावा आणि त्याचा थोड्या थोड्या वेळाने वास घेत रहा. हे तेल कपाळ, मान आणि पाठीला लाऊन मालिश करून रात्री झोपा. यामुळे तुम्हाला चांगली झोप येईल आणि डोकेदुखी दूर होईल.
० कसे ठरते फायदेशीर..?
लव्हेंडर एसेन्शियल ऑईल डोकेदुखी कमी करते. त्यामुळे मायग्रेनच्या रुग्णांसाठी हे लाभदायी ठरते.
8. कॉफी (Coffee)
० साहित्य –
कॉफी, पाणी, सुंठ पावडर
० वापरण्याची पद्धत –
गरम पाण्यात कॉफी पावडर मिसळून दूध, साखर न घालता प्या. वाटल्यास सुंठ पावडर मिसळा.
० कसे ठरते फायदेशीर..?
कॉफीमध्ये असणारे एनाल्जेसिक कॅफेन हे डोकेदुखीपासून सुटका मिळवून देण्यास कॉफी मदत करते. मात्र याचे अति सेवन करू नये. दिवसभरात साधारण ४०० मिली कॅफेन शरीरामध्ये घेणे ठीक आहे.
9. ग्रीन टी (Green Tea)
० साहित्य –
१ ग्रीन टी बॅग, १ कप गरम पाणी, लिंबाचा रस, मध
० वापरण्याची पद्धत –
ग्रीन टी बॅग १ कप गरम पाण्यात डीप करून स्वादासाठी लिंबाचा रस आणि मध मिसळून प्या. दररोज १ ते २ कप ग्रीन टी पिऊ शकता.
० कसे ठरते फायदेशीर..?
ग्रीन टी डोकेदुखी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. मात्र याचेही अतिसेवन करणे टाळावे. केवळ डोकेदुखी कमी करण्यासाठी हे पेय १ ते २ कप पिता येईल.
10. चंदन (Chandan)
० साहित्य –
आवश्यकतेनुसार चंदन पावडर, पाणी, चंदन तेल
० वापरण्याची पद्धत –
चंदन पावडरमध्ये पाणी मिसळून तयार पेस्ट डोक्यावर लावा आणि सुकू द्या. याशिवाय चंदन तेलाने मालिश करा किंवा त्याचा वास घ्या. तसेच गरम पाण्यात चंदन तेलाचे काही थेंब घालून त्याची वाफही घेता येईल.
० कसे ठरते फायदेशीर..?
चंदनाचा वास हा मनमोहक असून याचा थंडावा डोकेदुखी पटकन कमी करतो. तसंच याच्या वासानेच डोकेदुखी कमी होते.