Salt In Food
|

Tips To Reduce Salt In Food दैनंदिन जीवनात मिठाचा वापर कमी करण्यासाठी सोप्या टिप्स; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। रोजच्या आहारात आवश्यक असलेला एक पदार्थ म्हणजे मीठ. कारण मिठाशिवाय अन्नाला चव येत नाही. मिठाचा गुणच चव देणारा आहे. पण खूप कमी किंवा खूप जास्त मीठ जेवणाची चव बिघडवू देखील शकतो. (Tips To Reduce Salt In Food) त्यामुळे मिठाची मात्रा हि संतुलित असायला हवी. तुम्ही ऐकले असाल जेवणात एखाद्या पदार्थाला रुचकर बनविताना चवीनुसार मीठ घालण्याचा सल्ला दिला जातो. त्याचे कारणच हे आहे कि, मिठाची मात्रा चुकली तर सगळं मुसळ केरात.

Tips To Reduce Salt In Food

विशेष म्हणजे जेवणात जर मीठ कमी पडलं तर त्याच प्रमाण वाढवणं सोप्प आहे. पण जर जास्त झालं तर..? तर पहिली गोष्ट म्हणजे जेवणाची चव खराब होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अति मीठ खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक मानले जाते. कारण अति मीठ खाण्यामुळे रक्तदाबाचा त्रास होतो. एवढंच नव्हे तर, यामुळे किडनीच्यादेखील समस्या निर्माण होतात. तसेच मिठाचे अधिक सेवन थेट रोग प्रतिकार शक्तीवर मारा करते आणि यामुळे मीठ वापरताना आरोग्याचा विचार आधी करा.

Tips To Reduce Salt In Food

आतापर्यंत अनेक संशोधकांनी मीठ शरीरासाठी अपायकारक की फायदेशीर याबाबत विविध प्रकारे अनेक संशोधने केली आहेत. त्यापैकी प्रत्येक संशोधनात असं आढळून आलंय की, अति प्रमाणात मीठ खाण्यामुळे आरोग्यावर घातक परिणाम होतो. म्हणूनच आज आपण दैनंदिन जीवनात मिठाचा वापर कमी करण्यासाठी काही घरगुती सोप्या टिप्स जाणून घेणार आहोत. यामुळे मिठाची मात्रा संतुलित राहील आणि शरीराला अपाय होणार नाही.

० मीठ वापरताना या टिप्सचा वापर करा
(Tips To Reduce Salt In Food)

स्वयंपाक करताना मीठाचा वापर केवळ चवीपुरता करायचा आहे हे विसरू नका. त्यामुळे जर तुम्हाला खाद्यपदार्थांवर वरून मीठ घालून खाण्याची सवय असेल तर ती त्वरीत थांबवा. FSSAI (Food Safety And Standard Authority Of India)ने अन्नपदार्थांमध्ये मीठ घालुन खाण्याबाबत काही महत्वाच्या बाबी सांगितलेल्या आहेत. या फॉलो केल्यास शरीराला अपाय होणार नाही.
Tips To Reduce Salt In Food

१) अन्नपदार्थांमध्ये वरून मीठ टाकून खावेसे वाटत असल्यास मीठाला चांगले पर्याय शोधा. उदा. आमचूर पावडर, लेमन पावडर, काळीमिरी पावडर, ओवा, ऑरर्गेनो. या पदार्थांच्या वापरामुळे तुमची मीठ खाण्याची इच्छा कमी होईल.
२) स्वयंपाक करताना सतत थोडे थोडे मीठ टाकण्याऐवजी सर्वात शेवटी अन्नपदार्थांत मीठ घाला. यामुळे तुमचा मीठाचा वापर नक्की कमी होईल.
३) जेवताना पापड, लोणचे, चटणी, सॉस, साठवलेले पदार्थ खाण्याची सवय मोडा. कारण अशा पदार्थांमध्ये ते साठवून ठेवण्यासाठी अती प्रमाणात मिठाचा वापर केलेला असतो. हे पदार्थ रोज खाल्ल्याने शरीरात मीठाचे प्रमाण वाढते आणि आरोग्यविषयक तक्रारी जाणवतात. त्यामुळे असे पदार्थ नियमित खाण्याची सवय मोडायला हवी. Tips To Reduce Salt In Food
४) आपल्या दैनंदिन आहारातील पोळी, भाकरी, भात, डोसा, पुरी अशा पदार्थांमध्ये मीठ घालणे पूर्णपणे बंद करा. कारण त्यासोबत खाल्या जाणाऱ्या भाजी, डाळ, चटणी या पदार्थांमध्ये मीठ असतंच. त्यामुळे सर्वच पदार्थ जर मीठाचे असतील तर साहजिकच आहारातील मीठाचे प्रमाण जास्त असणार. यासाठी काही पदार्थांमध्ये जाणिवपू्र्वक मिठाचा वापर करणे बंद करा.

० मिठाचा अति वापरामुळे काय होत..?
(Eating Too Much Salt Side Effects)

माणसाच्या शरीराला सोडियमची गरज असते आणि मीठातून ही सोडीयमची गरज भागवली जात असते. मात्र जर हे प्रमाणात अती झालं तर त्याचा शरीरावर दुष्परिणाम होऊ लागतो. यासाठीच डॉक्टर नेहमी मीठाचे पदार्थ कमी खाण्याचा सल्ला देतात. तरीही आपल्या आहारात जर मिठाचा अति वापर होत असेल तर तुम्ही स्वतःहून स्वतःच्या हाताने रोज थोडं थोडं आपलं आरोग्य बिघडवत आहात. कारण अति मिठाच्या सेवनामुळे आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होते. जाणून घ्या दुष्परिणाम खालीलप्रमाणे:-

१) आपल्या शरीरात सोडियमचे प्रमाण वाढल्यामुळे रक्तप्रवाह वाढतो. अति रक्तप्रवाहाचा ह्रदय आणि रक्तवाहिन्यांवर दाब येऊन हायपरटेंशन वा अती रक्तदाबाचा त्रास जाणवतो.

high BP

२) अति मिठाच्या सेवनाने रक्तदाब वाढतो. परिणामी पुढे जाऊन ह्रदयविकाराचा झटका येण्याची शक्यता बळावते.

Tips To Reduce Salt In Food

३) आपल्या शरीरात सोडियमचा अतीसाठा तयार झाल्यामुळे किडनीच्या समस्या जाणवतात. आपल्या किडनीमध्ये स्टोन निर्माण होऊ शकतो.

Weight gain

४) याशिवाय मिठाचा असंतुलित वापर हा वजन वाढवतो. ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो.

५) अन्न पदार्थ खरेदी करताना त्याचे लेबल वाचा आणि कमीत कमी सोडियम असलेले उत्पादन निवडा. यामुळे आपोआपच खाद्यपदार्थ पदार्थ खाताना कमी मीठ झाले जाईल.

Eating

६) आपल्या चवी बदलण्याचा प्रयत्न करा. शक्यतो अळणी आणि अतिशय कमी मिठाचे पदार्थ खाण्यावर भर द्या. यामुळे तुमच्या शरीरात सोडियमची मात्रा वाढणार नाही आणि तुम्हाला निरोगी जीवनाचा आनंद घेता येईल.

आशा आहे कि वरील टिप्सचा तुम्हाला दैनंदिन जीवनात वापर केल्यास फायदा होईल. Tips To Reduce Salt In Food