Heart Care: मृत्यू देणारा हार्ट अटॅक टाळता येईल..? हो..पण कसा..?; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन| Heart Care आपल्या पूर्ण शरीरातील नाजूक आणि महत्वाचा भाग म्हणजे आपले हृदय. हृदयाच्या ठोक्यांची गती आपली जीवनशैली निरोगी वा रोगी असण्याचे स्पष्ट करत असते. शिवाय हृदयाची योग्य प्रकारे काळजी घेतली नाही तर हृदयाला रोग जडतात आणि परिणामी मृत्यू होण्याची शक्यता बळावते. त्यामुळे हृदयाची काळजी प्रामुख्याने घेण्याबाबत डॉक्टर नेहमी सतर्क करीत असतात.
तुम्ही पाहिले असाल की गेल्या काही काळापासून अनेक लोकांचा मृत्यू हा हृदय रोग आणि हृदय विकाराच्या झटक्यामुळेच होत आहे. कितीतरी लोक हृदयाची काळजी घेऊनही सतत आजारपणाने त्रस्त असतात. त्यात नेहमी फिटनेस बाबत सतर्क राहूनही हृदय जर आजारी पडत असेल तर मेहनतीचा फायदा काय..? असेही लोक म्हणतात. पण फक्त फिटनेस राखल्याने हृदय सुरक्षित आणि निरोगी राहते का…? मुळात या प्रश्नांचे उत्तर मिळणे आवश्यक आहे आणि याचे उत्तर नाही असे आहे. कारण फक्त फिटनेस राखून हृदयाला आवश्यक गोष्टींची पूर्तता होत नाही. तर हृदयाला आवश्यक असणारे घटक त्याला आहारातून मिळत असतात. म्हणून तुमचा आहार पूर्ण, सकस आणि पौष्टिक असणे गरजेचे आहे. (Heart Care)
इतकेच नव्हे तर हिंदी बिग बॉस १३ चा विजेता सिद्धार्थ शुक्ला हा त्याच्या फिटनेस ची आणि आहाराची नियमित योग्यप्रकारे काळजी घेत असे. तरीही त्याला हृदय विकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू सिनेसृष्टीतील अत्यंत धक्कादायक बातमी ठरली. यामुळे सिद्धार्थच्या निधनानंतर लोक आपल्या (Heart Care) हृदयाच्या आरोग्याबाबत अति काळजी करू लागले आहेत अलीकडच्या काळात सिद्धार्थ नंतर अनेक सेलिब्रिटी कलाकार, गायक आणि अगदी सामान्य लोकांनीही हृदय विकारा पायी जीव गमावला आहे. त्यामुळे हृदयाची काळजी नावापुरता नव्हे तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि खात्रीशीर औषधांच्या साहाय्याने घ्या.
पण जर तुम्ही तुमचा आहार उत्तम आणि जीवनशैली निरोगी ठेवलात तर तुमचं हृदय निरोगी राखण्यास मदत होईल. कारण आपल्या आहारात काही सुपर फुड्सचा समावेश केल्यास हृदयाचे आरोग्य राखणे सोपे जाते. आता सुपर फूड मध्ये तसे पाहता अनेक पदार्थांचा समावेश आहे पण काही खास पदार्थ असे आहेत ज्यांचा हृदयाचे आरोग्य राखण्यात विशेष हातभार लागतो. तर हे पदार्थ कोणते..? तेच आपण आता जाणून घेणार आहोत.
० हृदयाची काळजी घेणारे सुपरफुड (Heart Care)
अहो सुपरफूड सुपर फूड म्हणजे नक्की काय ओ..? तर सुपरफूड म्हणजे असे अन्न पदार्थ जे खाल्ल्याने आपल्या संपूर्ण शरीराला आवश्यक असणारे घटक सहज मिळतात. इतकेच काय तर सुपरफूड मध्ये फार जगावेगळे काही पदार्थ नसतात. अगदी रोजच्या आहारातील आणि आपल्या ओळखीचे पदार्थ सुपर डूपर असतात. त्याच पदार्थांची ओळख आज नव्याने करून घेऊ.
१) टोमॅटो –
आपल्या रोजच्या आहारात असणारा टोमॅटो आपल्या आरोग्याचा उत्तम साथीदार आहे. शिवाय टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात ॲण्टी ऑक्सिडंट्स असतात. जे आपल्या संपूर्ण आरोग्यासह (Heart Care) ह्रदयाची काळजी घेण्यास सक्षम आहेत. तसेच ते ऑक्सिडेटीव्ह डॅमेज कमी करण्यासाठी मदत करतात. ज्यामुळे कच्चे टोमॅटो नियमित खाल्ल्याने शरीरातील वाईट कॉलेस्ट्रॉल कमी होते आणि चांगले कॉलेस्ट्रॉल वाढते. यामुळे हृदयाचे आजारपणापासून संरक्षण होते.
२) पालक –
हिरव्या पालेभाज्या हृदयासाठी गरजेच्या असतातच. पण यातील पालक या भाजीला विशेष महत्व आहे. कारण पालकच्या पानात अधिक पोषण समाविष्ट असते. यामुळे हिरवा पालक अधिक पोषक मानला जातो. (Heart Care) तसेच पालकमध्ये मोठ्या प्रमाणात ॲण्टी ऑक्सिडंट्स, खनिजे, व्हिटॅमिन के समाविष्ट असतात. त्यामुळे तज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार हिरव्या पालेभाज्या खाताना पालक खाणे हृदयासाठी अधिक फायदेशीर आहे. यामुळे हृदय विकाराचा धोका १६ टक्क्यांनी कमी होतो.
३) ब्रोकोली –
ब्रोकोली ही प्लांट बेस्ड भाजी आहे. ज्यामध्ये प्रथिनांची मात्रा उच्च असते. तसेच हृदयासाठी आवश्यक असणारे पोटॅशियम, फोलेट हे ब्रोकोलीमध्ये मोठ्या मात्रेत मिळतातं म्हणूनच आहार तज्ञ सांगतात की १ कप उकडलेल्या ब्रोकोलीचा आहारात समावेश करा. यामुळे ५५० मिलीग्रॅम पोटॅशियम आणि १४ टक्के फोलेट मिळतं. ज्यामुळे हृदय विकाराच्या झटक्याची शक्यता कमी होते. (Heart Care)
४) ॲव्हाकॅडो –
ॲव्हाकॅडो एक असे फळ आहे जे सगळीकडे मिळत नाही. पण हे फळ आपल्या नाजूक हृदयासाठी अतिशय पौष्टिक मानलं जातं. कारण यामध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट्स, व्हिटॅमिन ई, के, बी ६ आणि सी भरपूर प्रमाणात असतं. यामुळे तज्ञ सांगतात की, नियमितपणे आपल्या आहारात ॲव्हाकॅडो असायला हवे. हे फळ खाल्ल्यास शरीरातील बॅड कोलेस्टरॉल कमी राहते. परिणामी हृदय रोगाची भीतीही कमी होते.
५) ऑलिव्ह ऑईल –
ऑलिव्ह ऑईलमधून भरपूर प्रमाणात मोनोसॅच्युरेटेड फॅट आणि ओमेगा ३ फॅटी ॲसिड आपल्या शरीराला मिळते. यामुळे रोज साधारण अर्धा टेबल स्पून ऑलिव्ह ऑईलचे सेवन केल्यास हृदय विकाराचा धोका किमान १५ टक्क्यांनी कमी होतो असे तज्ञांनी केलेल्या अभ्यासात सिद्ध झाले आहे. शिवाय यातील फॅट्स कॉलेस्ट्रॉल सुद्धा कंट्रोल करतात. (Heart Care) त्यामुळे ऑलिव्ह ऑईल खाणे फायदेशीर आहे
६) बेरी –
बेरीच्या प्रवर्गातील फळे हृदयासाठी फायदेशीर भूमिका निभावतात. यामध्ये स्ट्रॉबेरी, रासबेरी, मलबेरी असे बेरी प्रकारातली फळांचा समावेश आहे. ही फळे ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी खूप मदत करत असतात. (Heart Care) हा स्ट्रेस कमी झाला की आपोआपच हृदयविकाराचा धोका कमी होतो. म्हणून बेरी फळ खाणे फायदेशीर मानले जाते.
७) अक्रोड –
हृदयविकाराचा धोका कमी करायचा असेल तर तुमच्या आहारात अक्रोड असायलाच हवे असे तज्ञ आणि तज्ञांचा अभ्यास सांगतो. कारण अक्रोड हे असे फळ आहे जे मेंदू आणि हृदय यांची योग्य पद्धतीने काळजी घेऊ शकते. यामुळे नियमितपणे ३ ते ४ अक्रोड खा. यातील फायबर, मॅग्नेशियम, कॉपर, मँगनिज असे हृदयासाठी पोषक असणारे मायक्रो न्युट्रीयंट्स हृदयाची योग्य काळजी घेतात आणि हृफाय विकरांपासून त्याचे संरक्षण करतात.
८) चॉकलेट –
चॉकलेट तर असा पदार्थ आहे जो आवडत नाही असे लोक चुकूनच सापडतील. त्यामुळे चॉकलेट खा असे जबरदस्तीने सांगावे लागत नाही. पण चॉकलेट खाताना त्याचे प्रमाण मर्यादित ठेवा. तसे पाहत चॉकलेट तणाव दूर करतेच शिवाय यामध्ये असे अनेक पोषक फ्लॅव्होनॉइड्स असतात जे हृदयासाठी मोठ्या प्रमाणावर फायदेशीर आहेत. त्यामुळॆ हृदय विकार होणं विसरूनच जा. (Heart Care)