Navratri Fasting
|

Navratri Fasting – नवरात्रीच्या उपवासाला तेच तेच काय खायचं..?; मग ‘या’ हटके रेसिपी ट्राय कराच

हॅलो आरोग्य ऑनलाईन। (Navratri Fasting) सध्या अनेक लोकांचे नवरात्रीचे उपवास सुरु आहेत. अशावेळी कंट्रोल करायचं म्हटलं कि जास्तच भूक लागते. पण सारखं सारखं खाण्याला उपवास तरी कसं म्हणायचं..? म्हणून पोटाला दम देत मनाला स्थिर ठेवावं लागतं. बहुतेक लोक उपवासाला वरीचा भट आणि शेंगदाण्याची आमटी खातात. तर काही लोक साबुदाणा खिचडी किंवा वडा खाणे पसंत करतात. उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून हे उत्तम पर्याय मानले जातात.

Navratri Fasting Food

पण तरीही तेच तेच खाण्याचा कंटाळा पोट भरू देत नाही. काय प्रत्येक उपवासाला तेच खायचं..? (Navratri Fasting) म्हणून हे पदार्थ शक्यतो टाळले जातात आणि चटपटीत तोंडाला पाणी आणणारे तेलकट हॉटेलातील पदार्थ खाल्ले जातात. यामुळे साहजिकच मन भरलं तरीही आरोग्याची वाट लागू शकते. म्हणूनच उपवासाच्या दिवशी सोडा घातलेले उपवासाचे पदार्थ खाण्याचा मोह आवरता घ्या. यापेक्षा घरच्या घरी चविष्ट आणि खमंग पदार्थ बनवा.

Navratri Fasting Food

बरं बनवा असं बोलायला सोप्प आहे. पण बनवायचं काय..? हा प्रश्न उरतोच ना. तर टेन्शन घेऊ नका. आजचा हा लेख खास याच प्रश्नाचं उत्तर घेऊन आला आहे. आज आपण अशा काही पदार्थांविषयी जाणून घेणार आहोत. जे बनवायलाही सोप्पे आणि अत्यंत चविष्ट आहेत. त्यामुळे आता उपवास कंटाळवाणा होणार नाही तर मजेशीर आणि खमंग होईल.

० उपवासाच्या हटके आणि घरगुती रेसिपी (Navratri Fasting)

१) बटाटा पुरी –

बटाटा हा असा पदार्थ आहे जो सगळ्यांनाच आवडतो. मुख्य म्हणजे कोणत्याही बाजारात तो सहज उपलब्ध सुद्धा होतो. बटाटा प्रकृतीने वातूळ असला तरी शरीरासाठी पोषक गुणधर्मांनी परिपूर्ण असतो. त्यात शरीराला ऊर्जाही देतो. त्यामुळे उपवासाच्या पदार्थांमध्ये आवर्जून बटाटा वापरतात. पण प्रत्येकवेळी बटाट्याची भाजी किंवा चिप्स कशाला..? कधीतरी छान पुऱ्याही खाता येईल ना. (Navratri Fasting)

यासाठी बटाटा उकडून व्यवस्थित किसून घ्या. आता यामध्ये जीरं, हिरवी मिरची, मीठ घाला आणि एकजीव करा. आवडीप्रमाणे यात राजगीरा, साबुदाणा पीठ किंवा वरईचे पीठ मिसळा. हातावर थापता येईल एव्हढे पीठ सैल ठेवा. आता याच्या पुऱ्या थापून तेलात मस्त खरपूस तळून काढा. या पुऱ्या छान कुरकुरीत आणि चविष्ट लागतात. सर्व्ह करताना हिरवी चटणी, चिंचेची चटणी किंवा अगदी दह्यासोबत देऊ शकता.

२) स्मूदी बाउल –

(Navratri Fasting) उपवासाच्या काळात शरीराला ऊर्जेची अत्यंत आवश्यकता असते. दरम्यान शरीरातील पाणीदेखील कमी होत असते. ज्यामुळे अनेकदा डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. तर अशावेळी तुम्ही स्मूदी बाउल तयार करून खाऊ शकता. यामुळे तुम्हाला ताकद मिळेल आणि थकवा देखील जाणवणार नाही.

यासाठी सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे, तुम्हाला आवडणारी कोणतीही फळे धुवून साधारण एक तासभर फ्रिजमध्ये ठेवा. आता ही फळे कापून ग्राइंडरमध्ये टाका आणि त्यासोबत खजूर तसेच वाटीभर दूध घालून ग्राइंड करा. तुमचा स्मूदी बाउल तयार.. हा पदार्थ लगेच थंड असतानाच खाल्ल्यास अतिशय चविष्ट लागतो.

३) दही साबुदाणा –

आपण नुसता साबुदाणा वडा, खिचडी किंवा मग थालीपीठ झाले असतील. पण दही साबुदाणा हा वेगळा आणि चविष्ट पदार्थ कधी ट्राय केलाय का..? (Navratri Fasting) बनवायला अतिशय सोपा आणि झटपट होणारा हा पदार्थ खायला इतका चविष्ट लागतो कि काही सेकंदातच संपतो.

Dahi Sabudana

यासाठी साबुदाणा चांगला भिजवून घ्या. सकाळी व्यवस्थित भिजलेल्या साबुदाण्यात आवश्यकतेनुसार दही, साखर, मीठ आणि दाण्याचा कूट घाला. आता यावर तेलात जीरं, मिरची घालून मस्त फोडणी द्यायची आणि यात मिसळायची. दही आणि साखरेमुळे या पदार्थाला आंबट गोड चव येते. तर दाणे, मिरची, जीरं यांचा स्वाद हा पदार्थ आणखीच चविष्ट बनवितो. तर या उपवासादरम्यान हा पदार्थ नक्की बनवून खा.

४) कच्च्या केळ्यांचा उपमा –

नवरात्रीचा उपवास असेल तर कच्च्या केळीचा उपमा हि रेसिपी जरूर करून पहा. अतिशय सोप्पी, चविष्ट आणि सात्विक असा हा पदार्थ सगळ्यांना आवडेल याची खात्री आहे. (Navratri Fasting)

Raw Banana Upma

यासाठी कच्ची केळी धुवून उकडून घ्या. त्याचा लगदा होणार नाही याची काळजी घ्या. आता केळी सोलून जाड किसणीवर किसून घ्या. यानंतर साजूक तूपात जिरे, हिरवी मिरची चांगली तडतडू द्या. यानंतर त्यात केळीचा किस घालून परतून घ्या. आता चवीला मीठ, काळीमिरी पावडर, सैंधव मीठ आणि हिरवीगार कोथिंबीर घालून एक मस्त वाफ काढा. यानंतर खोवलेलं ओलं खोबरं वरून घालून मस्त गरमागरम उपमा, मलाईदार दह्यासोबत सर्व्ह करा.

५) काकडीची लस्सी –

उपवासादरम्यान होणारी डिहाड्रेशनची समस्या टाळायची असेल तर काकडीची लस्सी अतिशय उत्तम आणि चविष्ट पर्याय आहे. हा पदार्थ बनवायला वेळही कमी लागतो आणि श्रमसुद्धा. त्यामुळे या उपवासाला हि अनोखी काकडीची लस्सी नक्की ट्राय करा.

(Navratri Fasting) यासाठी मिक्सरच्या भांड्यात सोलून किंवा न सोलता तुमच्या आवडीप्रमाणे काकडीच्या फोडी करून घाला. यामध्ये घट्ट सायीचं दही, चवीला मीठ, बर्फाचे तुकडे, गरजेनुसार पाणी घालून व्यवस्थित फिरवून घ्या. आता तयार लस्सी ग्लासात ओतून त्यावर जिरे पावडर, काळीमिरी पावडर आणि पुदिन्याची पानं घाला. तुमची थंडगार काकडीची लस्सी तय्यार.

‘हे’ पण वाचा :-

Navratri Fasting Food – नवरात्रीचे व्रत करताना काय खावे आणि काय नाही..?; लगेच जाणून घ्या

Amla Juice Benefits: आवळा सरबत प्या आणि ‘या’ 5 आजारांपासून सुटका मिळवा

Daily Protein Requirements: आपल्या शरीराला नियमित किती प्रथिने आवश्यक आहेत..?; जाणून घ्या

उपवास आहे पण काय खावं कळत नाही?; लगेच जाणून घ्या

उपवास करत असाल तर फळाहार जरूर करा.. कारण; जाणून घ्या