तुम्हीसुद्धा जास्तवेळ AC मध्ये बसता का? वेळीच व्हा सावध, होऊ शकतात हे गंभीर आजार
हॅलो आरोग्य ऑनलाईन । सध्या बाहेर चांगलाच उन्हाळा जाणवत आहे. दुपारच्यावेळी थोडे बाहेर पडावे म्हटलं तरीसुद्धा जीवावर येतंय. अशामध्ये अनेकजण AC मध्ये बसने पसंद करतात. अनेक शासकीय व प्रायव्हेट कंपन्यांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत AC लावण्यात येतो. वातानुकूलित रूममध्ये उन्हाळ्यात बसायला सर्वानाच आवडते. थंड हवेमुळे आपल्याला AC मध्ये फ्रेशसुद्ध वाटते. मात्र जास्तवेळ AC मध्ये बसणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे अनेक गंभीर आजारही उद्भवण्याची शक्यता असते.
सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. बाहेर उष्णता खूप वाढली आहे. या ऋतूमध्ये, बहुतेक लोकांना पंख्यातून येणारी हवा आवडत नाही, म्हणून ते त्यांच्या घरातील वातानुकूलित खोल्यांमध्ये काम करणे आणि झोपणे पसंत करतात. परंतु एअर कंडिशनरच्या वापरामुळे काही हानिकारक दुष्परिणाम देखील होऊ शकतात जे तुमच्या शरीरासाठी त्रासदायक आहेत. आज आपण AC च्या अतिवापराने होणाऱ्या आजारांबाबत माहिती घेऊयात.
१) एअर कंडिशनर वापरल्याने आपली त्वचा कोरडी होऊ शकते. यामुळे त्वचेची नैसर्गिक आर्द्रता कमी होते जी नंतर त्वचेसाठी खूप हानिकारक ठरू शकते.
२) एअर कंडिशनरच्या वापरामुळे आपले डोळे कोरडे होतात. त्यामुळे डोळ्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण होतात आणि दृष्टी कमी होते.
३) जर तुम्ही एअर कंडिशनरचा जास्त वापर करत असाल तर थंडीमुळे अंगदुखी, चक्कर येण्याची समस्या सुरू होते.
४) एअर कंडिशनरमुळे झोप न येणं किंवा जास्त झोप लागणंही शक्य होतं.
५) एअर कंडिशनरमुळे शरीराला थंडावा मिळत असल्याने पाठदुखीचा त्रास होऊ शकतो.