Water Intoxication in winter | हिवाळ्यात जास्त पाणी प्यायल्याने होऊ शकतो हृद्यविकाराचा धोका, जाणून घ्या लक्षणे
Water Intoxication in winter | आपल्याला नेहमीच सांगितले जाते की, आपण जास्त पाणी पिले पाहिजे. परंतु ज्यांना हृदय आणि पोटाशी संबंधित गंभीर आजार आहेत त्यांनी हिवाळ्यात जास्त पाणी पिणे टाळावे. उष्णतेच्या तुलनेत थंडीत हृदयविकाराचा धोका वाढतो. हिवाळ्यात जास्त पाणी आरोग्यासाठी घातक ठरू शकते. आज आपण जाणून घेउया हिवाळ्यात हृदयाच्या रुग्णांनी कधी आणि किती पाणी प्यावे. कोरोना महामारीनंतर जगभरात हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
हिवाळ्यात हृदयविकार असलेल्या लोकांच्या समस्या वाढतात. उन्हाळा किंवा इतर ऋतूंच्या तुलनेत हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो.याचे मुख्य कारण म्हणजे थंडीत रक्त पंप करण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत करावी लागते. हिवाळ्यात शरीरातील शिरा आकसायला लागतात. अशा परिस्थितीत शरीराला उबदार करण्यासाठी हृदयाला जलद पंप करावा लागतो. त्यामुळे हृदयरोग्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढतात. थंडीच्या दिवसात जास्त पाणी पिणे तुम्हाला अडचणीत आणू शकते.
हेही वाचा –Peanuts Benefits | हिवाळ्यात शेंगदाणे खाल्याने होतात अनेक फायदे, आहार तज्ञांनी दिली माहिती
हिवाळ्यात जास्त पाणी पिणे हृदयाच्या रुग्णांसाठी हानिकारक आहे.
कोरोना महामारीमुळे जगभरातील लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढत आहे. थंडीच्या काळात हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या वाढते. थंड हवामानात त्याची प्रकरणे अनेक पटींनी वाढतात. त्यामुळे पाणी पिण्यापूर्वी विचार करायला हवा.
हिवाळ्यात जास्त पाणी पिणे हृदयासाठी धोकादायक असते
हिवाळ्यात, काही लोक सकाळी रिकाम्या पोटी उठल्याबरोबर 3-4 ग्लास पाणी पितात. हृदयरोग्यांनी असे काही केले तर त्यांचे खूप नुकसान होऊ शकते. अशा स्थितीत रक्तातील साखरेची पातळीही कमी होऊ शकते. अशा स्थितीत शरीराची स्वायत्त मज्जासंस्था ती सामान्य करण्याचे काम करते. जेव्हा एखादी व्यक्ती जास्त प्रमाणात द्रव आहार घेते तेव्हा हृदयाला पंप करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते.
रिकाम्या पोटी पाणी पिऊ नका, विशेषतः हृदयरोग्यांनी
हृदयरोगींनी रिकाम्या पोटी पाणी पिऊ नये. याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. कारण थंड पाण्यामुळे शिरा कडक होतात. त्यामुळे शरीराला रक्तपुरवठा करण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत करावी लागते. अशा स्थितीत हृदयविकाराचा धोका वाढतो. रिकाम्या पोटी पाणी प्यायचे असेल तर कोमट पाणी प्या. थंड पाणी पिऊ नका, यामुळे हृदयाच्या शिरा आकसतात.