तुम्हाला दारू चे व्यसन सोडायचे असेल तर ….
हॅलो कृषी ऑनलाईन । आपल्याला जर दारूचे व्यसन लागले असेल तर त्या व्यसनापासून दूर राहण्यास अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागेल. दारू हि पिताना कोणीही जाणून बुजून पिट नाही. पण जर आपल्याला दारूचे व्यसन हे जास्त प्रमाणात लागले तर मात्र ते सुटणे फार अवघड जाईल. दारू सोडणे हे काही अवघड काम नाही. पण जर आपली इच्छा आणि आणि प्रयत्न केले तर मात्र आपली दारू लगेच सुटू शकेल . कधीतरी चुकून पिली गेलेली दारू हे फार आयुष्य हे बरबाद करण्यास सुरुवात करते. ज्यावेळी आपण दारूच्या जवळ नसतो. त्यावेळी दारू पिण्याची सवय हि जास्त नसते. पण ज्यावेळी दारू सोडण्याची वेळ येते त्यावेळी दारू सुटली जात नाही.
एका परफेक्ट प्लॅन ने सुरु करा —
कोणत्याही कामाची सुरुवात करताना कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्लॅन तयार करणे आवश्यक आहे. त्या प्लॅन नुसार कोणतेही काम करायला सुरुवात करा. याबाबत शांतपणे विचार करून, रिसर्च करून एक परफेक्ट प्लॅन तयार करा. दारी सोडण्यासाठी कोणत्या गोष्टी तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील हे फक्त तुम्हीच ठरवू शकता. कारण तुमच्या सवयी तुम्हाला नीट माहीत असतात. यासाठीच छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून प्लॅन तयार करा. जसं की तुम्ही दारू पिण्याची इच्छा नेमकी कधी होते, त्यावेळी तुम्ही कोणत्या ना कोणत्या कामात स्वतःला गुंतवून ठेवा. त्यामुळे तुम्हाला दारूची आठवण येणार नाही. जर कधी तुम्हाला दारू पिण्याची इच्छा निर्माण झाली तर दारू सोडण्यासाठी कोणाची मदत घेऊ शकता याचा विचार करा . दारू सोडण्यासाठी तुम्हाला कोणापासून दूर राहण्याची गरज आहे आहे का याचा अभ्यास करा. दारूची इच्छा झाली तर ती दूर सारण्यासाठी तुम्हाला कोणती गोष्ट मदत करू शकते अशा गोष्टींवर बारकाईने विचार करा.
मोह टाळण्याचा प्रयत्न करा—
जर तुम्हाला नुकतंच दारूचं व्यसन लागलं असेल तर ते सोडण्यासाठी हा उपाय बेस्ट आहे. कारण दारू पिण्याचा मोह होईल अशा गोष्टी टाळल्या तर तुमचे व्यसन सहज सुटू शकते. जसं की विकऐंडला मित्रांसोबत बाहेर गेल्यावर अथवा पार्टी, पबमध्ये गेल्यावरच तुम्ही दारू पित असाल. तर अशा ठिकाणी जाणं टाळा . अश्या वेळी जे लोक आपल्याला दारू पिण्यासाठी फोर्स करतोय त्या मित्रांच्या किंवा व्यक्तीच्या सानिध्यात न राहण्यास सुरुवात करा. ज्यामुळे तुम्हाला दारूचा मोह होणार नाही. थोडक्यात तुम्हाला दारू पिण्याचा मोह नेमका कधी होतो हे शोधा. ज्यामुळे त्या गोष्टी टाळता आल्या तर तुम्हाला दारूपासून दूर राहणं नक्कीच जमेल. जास्तीत जास्त दारू पिण्याच्या वेळेत किंवा मित्रांबरोबर जाताना दारू हा विषय सोडून इतर गोष्टींबाबत चर्चा करा.
हळूहळू दारू पिणे कमी करा —
माणसाला चांगल्या सवयी लावायच्या असतील तर त्यासाठी खुप प्रयत्न केले जातात. पण त्याचा जागी जर वाईट सवयी लावायच्या असतील तर मात्र आपल्याला लगेच लागू शकतात. हा माणसाचा गुणधर्म आहे. त्यामुळे वाईट सवयींपासून जितके दूर राहणे शक्य आहे तेवढे दूर राहणे गरजेचे आहे. दारू पिणे शरीरासाठी मुळीच चांगलं नाही. पण जर तुम्हाला नेहमी आणि अती प्रमाणात दारू पिण्याची सवय लागली असेल. तर ती अशी पटकन सोडणं नक्कीच शक्य नाही. उलट असा प्रयत्न केला तर तुम्ही कधीच दारू सोडवू शकणार नाही अशी तुमची धारणा होईल. यासाठीच हळूहळू तुमचे दारू पिणे कमी करा.
एक मजबूत टीम तयार करा —
आपल्याला दारू पिण्याची इच्छा हि कोणत्या हि वेळेत होऊ शकतो. पण ज्यावेळी तुम्हाला दारू पिण्याची इच्छा राहते. त्यावेळी तुम्ही अश्या लोकांच्या सान्निध्यात राहा. कि जे तुम्हाला सतत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुम्हाला दूर राहण्यास मदत करू शकतील . याची माहिती घ्या. आपल्या जवळपास अशी अनेक चांगली लोक आहेत कि ,त्यांना आपण दारू सोडावी असे वाटत असते अश्या वेळी त्या लोकांची मदत घ्या त्याने तुम्हाला दारू सोडण्यास अजून काहीतरी कारण मिळेल .
दारू का सोडली पाहिजे याचे कारण शोधा —
जर तुम्ही दारूच्या खूप अधीन गेला असाल तर दारू का सोडली पाहिजे याचा विचार करा. कधी कधी दारू सोडावी असे वाटत असते पण एक ठराविक वेळेनंतर दारूची आठवण हि येत राहते. त्यामुळे तुमच्या आयुष्यात असे कोणते स्ट्रॉंग पॉईंट आहेत ते जाणून घ्या , आणि ज्यावेळी आठवण येते त्यावेळी ते स्ट्रॉंग पॉईंट हे लक्षात ठेवा.किंवा सतत आठवण करा. आपल्या आई वडिलांचे कष्ट आठवण्याचे प्रयत्न करा.
दारूला कोणत्या प्रकारचे पर्याय शोध —
दारू सोडणे हे खूप आवश्यक असले तरी ते सुटणे फार अवघड असते. त्यामुळे अश्या वेळी दारूला सोडण्यासाठी तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टींमध्ये तुमचा वेळ घालवा. किंवा दारूला कोणत्याही प्रकारचे एक पर्यायी ड्रिंक शोधा कि ,ज्याने तुम्हाला आणि तुमच्या शरीराला मदत होऊ शकते. ज्या गोष्टींमध्ये आपले मन रमते अश्या गोष्टी करण्यास सुरुवात करा.