प्रेगन्सी च्या काळात लोणचे खाणे योग्य कि अयोग्य ?
हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । प्रत्येक महिलांना आपल्या गरोदर पणाच्या काळात खूप काळजी घ्यावी लागते. गरोदर पणात आपल्या आहारात सुद्धा खूप बद्धल करावे लागतात. कारण त्या काळात त्यांना कोणत्याही पदार्थांचे पचन हे होत नाही. पचन न झाल्याने पोटाचे विकार होण्यास सुरुवात होते. सुरुवातीचे काही दिवस तर कोणतेच पदार्थ हे महिलांना पचत नाहीत. त्यामुळे महिलांना त्या अनेक वेळा आजारांना सामना करावा लागतो.
गरोदर च्या काळात अनेक वेळा महिलांना आपल्या छोट्या छोट्या सवयी या बदलाव्या लागतात. बाळासाठी अनेक पदार्थ हे दूर ठेवावे लागतात. गर्भारपणाच्या काळात अनेक वेळा महिलांना आंबट , तुरट हे पदार्थ खावेसे वाटत. कधी चिंच खा , तर कधी आंबट बोरे खा , तर कधी हळूच कोणाच्या नकळत माती खा असे उपक्रम सुरु असतात. पण हे सगळे पदार्थ महिलांच्या खाण्यात आले तरी त्यांना कोणत्या हि प्रकारचा त्रास हा होत नाही. पण जर महिलांच्या आहारात जर आंबट असे लोणचे आले तर त्याचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर काय होतो ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया ..
आंबट लोणचे खाणे हे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगले आहे, पण त्याचे प्रमाण हे आहारात जास्त असता कामा नये. हि काळजी प्रत्येक गर्भवती महिलेने घेतली पाहिजे. गर्भ वाढत असताना त्यांच्या शरीराला वेगवेगळी जीवनसत्व, खनिजे , प्रथिने यांचा समावेश असणे गरजेचे आहे. लोणचे तसेच आंबट कोणत्याही पदार्थांचे सेवन हे असले पाहिजे. बाळाच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण आणि योग्य प्रकारच्या प्रतिकार शक्ती असणे गरजेचे आहे. लोणचे हे प्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करते . लोणचे यामध्ये बॅक्टरीया याचे प्रमाण हे जास्त असते. त्यामुळे ते आपल्या आतड्यांपर्यंत पोहचून पचन क्रिया वाढवण्याचे काम करते.
लोणचे खाण्याचे तोटे —
लोणच्यात जास्त प्रमाणात मीठ असते त्यामुळे महिलांना ब्लड प्रेशर यासारख्या समस्या जाणवू शकतात. ज्या महिलांना उच्च रक्तदाब यासारख्या समस्या असतील त्या महिलांनी लोणचे याचे प्रमाणात आहारात ठेवू नये.
ऍसिडिटी होते —
लोणचे याचे प्रमाण जर आहारात जास्त ठेवले तर ऍसिडिटी सारख्या आजारांना सामोरे जावे लागते.
छातीत जळजळ होते —
लोणचे यामध्ये आंबट , खारट , तुरट असे सगळ्या चवीचे पदार्थ हे मिक्स असतात, याचे सेवन जर जस्त्र प्रमाणात झाले तर मात्र छातीत जळजळ होण्यास सुरुवात छातीत जळजळ झाल्याने इतर खूप त्रास हा होतो. अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे महि लांनी बाजारात मिळणाऱ्या लोणच्यांपेक्षा घरी बनवलेल्या लोणच्याचा वापर हा आहारात करावा. जर आहारात लोणचे समावेश करत असाल तर मात्र पाण्याचे प्रमाण हे जास्त ठेवावे.