रताळे खाण्याचे हे आहेत नुकसान
हॅलो आरोग्य ऑनलाईन । रताळे हा खाण्यासाठी उत्तम पदार्थ आहे. त्याचा वापर हा जास्त प्रमाणात उपवासाच्या दिवशी केला जातो. उपवासाच्या दिवशी रताळे हे आवडीने खाल्ले जातात. रताळे यामध्ये काही प्रमाणात साखरेचे प्रमाण असते. त्यामुळे मधुमेही असणाऱ्या लोकांसाठी रताळे खाणे व्यर्ज आहे. तसेच इतर आजार असणाऱ्या लोकांनी सुद्धा रताळे हे कमी प्रमाणात खाल्ले पाहिजेत. कोणत्या आजारांसाठी रताळे हे खाल्ले जाऊ नयेत हे जाणून घेऊया …
शिजवून खावे —
रताळे हे खाताना कमीतकमी अर्धा तास शिजवलेले रताळे खाल्ले गेले पाहिजेत. त्यामुळे त्याच्यामधला ग्लोबल इंडेक्स हा कमी होणार नाही. त्यामुळे रताळे खाताना उकडून घेऊनच खाल्ले जावेत जर कच्ची रताळी खाल्ली तर मात्र आपल्याला अपचनाचा त्रास हा जास्त प्रमाणात व्हायला सुरुवात होते.
मधुमेही लोकांसाठी —-
ज्या लोकांना मधुमेह आहे त्या लोकांनी त्यांच्या आहारात रताळे खाऊ नयेत . कारण जर तुम्ही रताळ्याचे प्रमाण जास्त ठेवले तर मात्र मधुमेहाचा धोका हा जास्त प्रमाणात जाणवू शकतो. त्याच्यामध्ये काही प्रमाणात साखर असते.
यकृत —
ज्या लोकांना यकृताचा त्रास आहे त्या लोकांनी आपल्या आहारात रताळे ठेवू नयेत. त्यामुळे अतिसार , उलट्या याच्या समस्या जास्त प्रमाणात जाणवतात. यकृताचा साधारण कोणताही आजार असला तरी तुम्ही तुमच्या आहारात रताळे अजिबात ठेवू नका.
मुतखडा —
ज्या लोकांना मुतखडा याचा त्रास हा जास्त आहे त्या लोकांनी आपल्या आहारात रताळे अजिबात ठेवू नका कारण रताळ्यामधे कॅल्शियम आणि ऑक्सिलेट चे प्रमाण हे जास्त असते.
पोटाचा त्रास —
जर तुमचे पोट हे वारंवार खराब होत असेल तर अश्या वेळी तुम्ही तुमच्या आहारात रताळ्याचा समावेश न केलेला बरा . त्यामुळे पोटाच्या कोणत्याही समस्या तुम्हाला जाणवणार नाहीत.