बाळांमधील अतिसारावर घरगुती उपाय
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या बाळाला जर कधी कधी अपचनाचा त्रास हा जास्त प्रमाणात होत असेल तर अश्या वेळी आपण त्याची काळजी हि खूप जास्त प्रमाणात घ्यायला हवी आहे. पण जर बाळाला जर जास्त प्रमाणात पातळ शी होत असेल तर अश्या वेळी त्याच्या आहारात काही बद्धल करणे आवश्यक आहे. अपचनाचा त्रास हा जास्त प्रमाणात झाला कि , बाळाला सुद्धा त्रास होण्यास सुरुवात होते. आईच्या खाण्यात कधी जर चुकीचे पदार्थ आले तर मात्र बाळाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे बाळाला जर जास्त प्रमाणात अतिसार होत असेल तर घरगुती उपयांपैकी कोणते उपाय करता येतील याबद्धल माहिती घेऊया ….
ओरल डिहायड्रेशन सोलुशन—
हे द्रव्य बाळासाठी फार लाभकारी आहे. हे द्रव्य हे बाहेर च्या मेडिकल मध्ये सुद्धा सहज रित्या मिळू शकते किंवा तुम्ही घरगुती पद्धतीने हे द्रव्य तयार करू शकता . काही महिन्यांच्या बाळाला जुलाब होत असतील तर अनेक घरगुती उपाय आहे. ORS तुम्ही औषधांच्या दुकानातून आणू शकता किंवा घरी तयार करू शकता.१ लिटर उकळलेले पाणी थंड करा, त्यामध्ये ६ टी स्पून साखर आणि १ टी स्पून मीठ घाला, ते विरघळेपर्यंत चांगले ढवळा. निर्जलीकरणा पासून आणि क्षार व द्रव्याच्या कमतरतेपासून बाळाला वाचवण्यासाठी थोड्या थोड्या वेळाने बाळाला हे पाणी देत रहा. भाताची पेज हा सुद्धा क्षार आणि द्रव्याचा ऱ्हास भरून काढण्यासाठीचा उत्तम मार्ग आहे.
— केळ
जुलाबामुळे बाळामध्ये पोटॅशिअम चा ऱ्हास होतो व तो भरून काढणे आवश्यक असते. केळ्यामधे पोटॅशिअम ,कॅल्शिअम, जस्त, लोह, व्हायटॅमिन अ आणि ब ६ असते. जुलाबामुळे जेव्हा शरीर गळून गेलेले असते तेव्हा केळं हा ऊर्जेचा एक चांगला स्रोत ठरतो, आणि सुदैवाने मुलांना केळ्याची चव आवडते. केळं वर्षभर उपलब्ध असते आणि सगळ्या घरांमध्ये असते.
—- सफरचंद
सफरचंदामध्ये भरपूर पेक्टिन असते. शी घट्ट होण्यास ते मदत करते. सफरचंद पाण्यात चांगले उकळा, त्याची प्युरी करा. त्यामुळे ते पचायला हलकं जाईल. ह्यामुळे जुलाब थांबून बाळाला तरतरीत वाटेल.
—- लाह्या
काही प्रमाणात लाह्या खाल्या तर मुलांना पचायला अवघड जात नाही. त्यामुळे दिवसातून दोन ते तीन वेळा बाळाला पाणी पाजून काही प्रमाणात लाह्या या काही प्रमाणात खायला दिले गेले पाहिजे. त्यामुळे पचायला त्रास हा होत नाही.