What exactly is ape fever?
|

माकडताप म्हणजे नेमके काय ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  माकडताप हा आजार पहिला कधी प्रचलित नव्हता . काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये झालेल्या वाढीमध्ये या हि आजारांच्या रुग्णाची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले होते .त्यामुळे पण आत्ता सगळ्या ठिकाणी या नावाचा रोग हा माहित झाला आहे . माकडताप हा असा रोग आहे कि त्या आजारावर अजूनही कोणत्याही प्रकारचे औषध उपलब्ध नाही. त्यामुळे माकडताप हा आजार होण्यापूर्वी खूप काळजी घ्यावी लागते. काही दिवसांपूर्वी माकडताप या आजाराची लक्षणे असलेली लोक हे भारतात आढळली होती. त्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. माकडताप हा आजार संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे हा आजार एकाला झाला तर त्यामुळे इतरांना सुद्धा हा आजार होण्याची दाट शक्यता असते.

माकडताप या आजाराचा पहिला रुग्ण कर्नाटकात आढळला होता. त्यावरून त्या तापाला क्यासनुर फॉरेस्ट  डीसीज असे नाव प्रचलित झाले. त्याला माकडआजार किंवा माकडताप असे म्हटले जाऊ लागले. खूप वर्षांपूर्वीपासून हा आजार अस्तित्वात असल्याचे संशोधनातून उघड होत असल्याचे सांगण्यात येते. हा आजार आत्तापर्यंत माणसांमध्ये पसरला गेला नव्हता . या आजाराचा प्रसार हा प्राण्यांपासून होतो. गाई, पशु , खार किंवा उंदीर या गोष्टींमुळे हा आजार जास्त प्रमाणात होतो. प्राण्याच्या संपर्कात आल्याने हा आजार माणसाच्या शरीरात प्रसार करायला सुरुवात करते. प्राण्यांपैकी माकडांमध्ये याचे विषाणू जास्त असतो. त्यामुळे या विषाणूचा प्रसार जास्त करून माकडांच्या मार्फत होतो. ज्या प्रकारची लक्षण माकडाला असतात. त्याच प्रकारची लक्षणे हि पूर्णतः माणसांच्या शरीरात दिसायला सुरुवात होते. माकडाच्या शरीरावर खूप जास्त प्रकारच्या पिसवा असतात. त्या पिसवांनी जर माकडाला चावा हा जास्त प्रमाणात घेतला तर त्यांच्या शरीरात आणि रक्तात त्या पिसवांचे संक्रमण होते आणि ताप यायला सुरुवात होते. पिसवा हा प्राणी मनुष्यासाठी सुद्धा फार घातक आहे. त्यामुळे प्राण्यापासून दूर राहत आणि आपली काळजी घेत. प्राण्यांशी संपर्कात राहिले पाहिजे .

या आजारामध्ये कमीत कमी बारा दिवस अथवा अधिक काळ ताप असणे, तापाचे प्रमाण हे जास्त असते. डोक्याच्या पुढील भागात तीव्र वेदना, नाक, घसा, हिरडय़ांतून प्रसंगी रक्तस्राव, अतिसार, उलटय़ा, खोकला, मान, कंबरदुखी, विष्ठेतून रक्त पडणे, सांधेदुखी, अशक्तपणा, पांढऱ्या पेशी व प्लेट्सचे प्रमाण खालावणे, अश्या साऱ्या समस्या निर्माण होतात. अशी लक्षणे आढळ्यास या कालावधीत अधिक दक्षता घेणे गरजेचे असते. या आजार जास्त करून जंगलामध्ये किंवा त्या परिसरात काम करणाऱ्या शेतकरी, वन कर्मचारी व सर्वसामान्यांना या आजाराचा धोका अधिक असतो. त्यासाठी अंगभर कपडे घालून जंगलात काम केले पाहिजे.