Take care before using the hair dryer
|

हेअर ड्रायर चा वापर करण्यापूर्वी घ्या हि काळजी

हॅलो आरोग्य  ऑनलाईन ।  अनेक जण आपले केस हे सुंदर करायचे असतील किंवा कोरडे करायचे असतील त्यावेळी हेअर ड्रायर चा वापर करतात. केस कोरडे करावयाचे आहे मग उन्हात कोरडे करणे हे चांगले पर्याय आहे. पण जर हवामान ढगाळी पावसाळी किंवा थंडीचे असेल केसांना कोरडे करण्यासाठी ड्रायरचा वापर करावा लागतो. जर केस लवकर कोरडे झाले नाही तर त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात कोंडा हा तयार होतो. जर आपण नियिमतपणे ड्रायरचा वापर करता तर मग या पासून होणारे तोटे आणि खबरदारी बद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. कधी कधी याच हेअर ड्रायर चा जास्त प्रमाणात वापर होत असेल तर त्या वेळी अतिशय कोरडे होतात. तसेच आपल्या केसांमध्ये कोंडा वाढण्याचे प्रमाण सुद्धा जास्त असते. त्यापासून मिळणारी उष्णता हि आपली केसांच्या वाढीला त्रासदायक ठरू शकते. कोणत्या प्रकारची काळजी हि आपल्या केसांसाठी करू शकता. हे जाणून घेऊया ….

—- हेयर ड्रायरचा वापर करताना हे लक्षात ठेवा की केसांपासून याची दुरी जास्त इंच असावी. असे केले नाही तर केसांमध्ये कोरडेपणा वाढेल आणि ते लवकर तुटू लागतील.

—– ड्रायरचा वापर करण्याच्या पूर्वी केसांमध्ये नरिशमेंट सीरम लावावे, जेणे करून ड्रायरच्या उष्णतेमुळे केसांना काहीही नुकसान होऊ नये आणि केस मऊ व्हावे.

— आपल्या केसांच्या प्रकारानुसार हेयर ड्रायरचा वापर करणे योग्य राहील. जसे की केस कुरळे आहे, रुक्ष आहे, मऊ आहेत किंवा रेशमी आहेत, त्यानुसार आपल्याला तापमान किंवा वेळेची आवश्यकता असेल.

—– ड्रायर वापरण्यापूर्वी केसांना कंडीशनींग करणे विसरू नका. बऱ्याच वेळा चांगल्या प्रकारे न वापरल्यामुळे केस कोरडे होण्यासह गुंततात, या मुळे ते तुटतात.

—- रुक्ष आणि कोरड्या केसांमध्ये शक्य असल्यास कमी ड्रायर वापरा किंवा कोल्ड ड्रायर वापरा कारण या मध्ये आयन असतात जे पॉझिटिव्ह असतात आणि त्याच्या हवेत उष्णता कमी असते.

—- जर आपल्यासाठी हेयर ड्रायरचा वापर करणे आवश्यक आहे तर केसांना नियमितपणे तेल लावा, जेणे करून केसांना पुरेशे पोषण मिळेल. ड्रायरचा जास्त वापर केल्याने हे केसांमधील पोषण काढतो.

—- केस बळकट आणि पोषित ठेवण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष द्यावे. आपल्या आहारात आवळा, हिरव्या पालेभाज्या, ज्यूस, दही इत्यादी समाविष्ट करावे जेणे करून केसांना पोषण मिळेल.