How to make a neem face pack for hair
|

कडूलिंबाचे निरनिराळे फायदे

हॅलो आरोग्य  ऑनलाईन ।  कडुलिंबाच्या पानांचे अनेक वेगवेगळे फायदे आहेत. त्याच्या पानांपासून  वेगवेगळी औषधे बनवली  जातात.  कडुलिंबाचा वापर हा दररोज सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत  वेगवेगळ्या वापरासाठी केला तरी चालू शकते.  आयुर्वेदात कडुलिंबाच्या पानाला  खूप महत्व आहे . कडुलिंबाचा वापर हा सकाळच्या वेळेत अंघोळीसाठी सुद्धा केला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला फ्रेश वाटते. तुमच्या अंगदुखीच्या समस्यांपासून सुटका  मिळण्यासाठी  कडुलिंबाचा वापर हा  गरम पाण्यात करू शकता.

कडुलिंबाचे इतर असणारे फायदे — 

—- कडूलिंब दात आणि हिरड्यांच्या आजारांपासून तुम्हाला दूर राहण्यास मदत करतं.

—- कडूलिंबामध्ये असलेल्या अँटिफंगल तत्वामुळे फंगल इन्फेक्शन ठीक होतं.

—- कडुलिंबामध्ये याचं सेवन केल्यामुळे अल्सर आणि बद्धकोष्ठ, पोटातील मुरड आणि सूज यासारख्या समस्या उद्भवत नाहीत.

— केसांमध्ये चमक आणण्यासाठी शँपूमध्ये थोडंसं कडूलिंबाचं तेल मिसळून घ्या आणि नंतर केस धुवा. असं केल्याने तुमचे केस अधिक मुलायम आणि चमकदार होतील.

— केसांमध्ये खाज येत असल्यास अथवा उवा झाल्यास, कंगव्यावर कडूलिंबाचं तेल लावून केस झाडा.

— कडुलिंबाच्या काठीने दात साफ केल्यास, किड लागत नाही आणि दात अधिक मजबूत होतात.

— मुतखडा झाल्यास, कडूलिंबाची पानं अतिशय फायदेशीर आहेत. रोज या पानांची पावडर पाण्यात विरघळवून प्यायल्यास, मुतखडा निघायला मदत होते. लघवीमार्फत मुतखडा निघून जातो

— जाडेपणा कमी करण्यासाठी तुम्ही याची पानं तूपामध्ये उकळून घ्या आणि चावा.

—- पोटामध्ये दुखत असल्यास, गोड कडूलिंबाची पानं चावा.

— तोंड आलं असल्यास,  कडूलिंबाची पानं दिवसातून दोन वेळा खा. त्यामुळे तुमचं तोंड बरं होईल

— जंत झाले असल्यास, कडूलिंबाच्या पानांचा रस प्यायल्याने त्रास दूर होतो.

—- कडूलिंबाची पानं जाळल्यास, डास नाहीसे होतात.

— घशामध्ये खरखर असेल तर गोड कडूलिंबाची पानं खडीसाखरेबरोबर खाल्ल्यास, घसा बरा होतो.

— साप चावल्यास, कडूलिंबाच्या पानांचा रस प्यायला द्यावा याचा फायदा होतो.

— कडूलिंबाचा चहा प्यायल्याने पोटामधील जंतांपासून सुटका होते.

—- तुमच्या कानामध्ये दुखत असेल तर कडूलिंबाच्या तेलाचा वापर केल्यास, फायदेशीर ठरेल.

—- जळलेल्या, कापलेल्या घावावर कडूलिंबाच्या पानाची पेस्ट लावल्यास, फायदा होतो.

— कडूलिंबाची पानं उकळून याची वाफ घेतल्यास, तुम्हाला बऱ्याचआजारांपासून सुटका मिळू शकते.

—- पावसाळ्यात बऱ्याचदा शरीरावर फोड होतात, त्यापासून वाचण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाची पानं घालून आंघोळ केल्यास, या पुळ्या निघून जातील.