केसांची निगा राखण्यासाठी तेल कसे आणि कधी लावावे ?
हॅलो आरोग्य ऑनलाईन । केस लांब सडक आणि मजबूत हवे असतील तर केसांची योग्य पद्धतीने काळजी घेणे आवश्यक असते, केस पातळ असतील तर आपल्या सौदर्यात नेहमी कमीपणा जाणवायला सुरुवात होते. केसांसाठी तेल लावणे गरजेचे असते.आपली केस मोठे आणि लांब असतील तर त्यावेळी केसांची काळजी घेताना आठवड्यातून एकदा तरी तेल लावणे गेले पाहिजे. तेल लावल्याने आपल्या केसांची चमक वाढते. आणि केस मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे केसांना तेल लावताना कश्या पद्धतीने लावणे आवश्यक आहे. आपल्या केसांना तेल किती प्रमाणात आणि कधी लावले जावे याची माहिती घेऊया ….
सर्वप्रथम आपण तेल कधी लावले जाऊ शकते ते समजून घेऊया . केसांना तेल लावताना तुम्ही कोणत्याही वेळेत लावू शकता. पण जर केसांना तेल लावल्यानंतर तुम्ही घराच्या बाहेर अजिबात पडू नका . प्रदूषणात तर अजिबात जाऊ नका . आजूबाजूची धूळ हि आपल्या केसांवर चिकटत असते. त्यामुळे केस हे अजून खराब झालेले दिसतात. त्यामुळे आपल्या चेहऱ्याची त्वचा सुद्धा खराब होण्यास सुरुवात होते. आपल्या चेहऱ्यावर डाग येण्यास येतात . त्यामुळे शक्यतो केसांना तेल लावताना रात्री झोपतानाच तेल लावणे योग्य राहील.
तेल कसं लावावे —-
आपण केसांना तेल लावण्यापूर्वी त्याला कोमट करा. त्याच्यामध्ये काही प्रमाणात कापूर टाकावा. आपल्या हातांची टोकं बुडवून केसांच्या मुळात तेल लावून मालिश करा. केसांना मालिश करताना हळुवार पणे केसांची मालिश करा. त्यामुळे केस अजिबात तुटणार नाहीत. केसांना धुण्यापूर्वी केसांना वाफ द्या. या मुळे केसांच्या मुळांपर्यंत तेल पोहोचेल आणि केस निरोगी आणि चमकदार होतील. तसेच शॅम्पूला पाण्यात घोळून केसांवर वापरा. त्यामुळे तो शाम्पू सगळ्या केसांच्या भागाला पोहचू शकेल .