Why does itching occur during pregnancy?
|

प्रेगन्सी मध्ये खाज सुटतेय ? तर हे करा घरगुती उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  गरोदर पणात महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांच्या खाण्या – पिण्याच्या सवयी मध्ये खूप सारे बदल करावे लागतात. प्रेगन्सी मध्ये काही काळ महिलांना आपल्या इच्छा आकांक्षा दूर ठेवून बाळाची काळजी घ्यावी लागते. महिलांना काही काळ तरी आरामाची गरज असते . प्रेग्नन्सी च्या काळात महिलांना त्यांच्या पोटावर जास्त प्रमाणात खाज उठायला सुरुवात होते. त्यावेळी महिलांनी कश्या प्रकारे घरगुती उपाय करणे आवश्यक आहे ते जाणून घेऊया …

पोटाच्या भागात जर खाज जास्त प्रमाणात सुटत असेल तर अश्या वेळी महिलांनी घरगुती उपायांमध्ये कसे आणि काय करावे साधारण तिसऱ्या महिन्यांपासून महिलांना खाज उठायला सुरुवात होते. खाज उठणे हि एक नॉर्मल पद्धत आहे. अश्या वेळी जास्त खाज सुटत असेल तर मात्र कोल्ड कॉम्प्रेस वापरावे. दररोज काही प्रमाणात तयार बर्फ घ्यावा . आणि ज्या भागात खाज हि जास्त सुटली जाते त्या भागात तो बर्फाचा गोळा हा फिरवला जावा. दिवसातून कितीही वेळा हा उपाय करू शकता. पण ज्या वेळी दाह जास्त असेल अश्या वेळीच आपण बर्फाचा तुकडा वापरू शकता, त्यामुळे त्या भागाची खाज कमी कमी होत जाते.

बेरी लोशन हे सुद्धा त्या भागावर लावू शकता . त्याच्यामध्ये काही प्रमाणात लवंगा आणि काही प्रमाणात बदाम तेल घेऊन त्याच्या साह्याने मालिश करा. त्यामुळे खाजवण्याचे प्रमाण हे कमी कमी होत जाते. हे तेल काही प्रमाणात गरम करून त्याचा वापर हा महिलेच्या पोटावर करू शकता.

लिंबाचा रस —-

काही प्रमाणात लिंबू घ्या. त्याचा संपूर्ण रस काढून घ्या . त्याच्यामध्ये काही प्रमाणात पाणी ओता पातळ झालेला रस हा कापसाच्या साह्याने पोटाच्या भागावर लावा. त्यामुळे त्या भागाला आराम मिळतो आणि खाज सुटण्याचे प्रमाण हे कमी कमी होत जाते. त्यामुळे आपल्या शरीराला आराम मिळण्यास मदत होते. हरभरा पिठाचा वापर सुद्धा आपल्याला आपल्या पोटासाठी खाज कमी करण्यास होऊ शकतो.