These are the benefits of working out at home
|

घरात वर्कआऊट करण्याचे हे आहेत फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  आपल्याला आपल्या कामातून वेळ काढत दररोज काही ना काही प्रमाणात व्यायाम करणे आवश्यक आहे . दररोज व्यायाम करण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.पण कधी कधी वय जास्त असले किंवा काही कारणाने घराच्या बाहेर पडणे शक्य होत नाही. सध्याचा काळ हा कोरोनाचा काळ आहे त्यामुळे घराच्या बाहेर पडणे हे जास्त मुश्कील झाले आहे. त्यामुळे घरातच काही प्रमाणात व्यायाम करणे योग्य राहील . तसेच प्रदूषणापासून दूर राहण्यासाठी सुद्धा घरातच व्यायाम हा करू शकतो. त्याचे फायदे सुद्धा वेगवेगळे आहेत.

नृत्य करा —-

घराच्या बाहेर जर पडण्याची जर इच्छा होत नसेल किंवा बाहेर जाण्याचे शक्य होत नसेल तर अश्या वेळी आपल्याला जमेल त्या पद्धतीने घरातच नृत्य करण्याचा सराव हा केला जावा. त्यामुळे शरीरच्या सगळ्या अवयवांची हालचाल सुद्धा व्यवस्थित होते. नृत्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहण्यास मदत होऊ शकते.

योग आणि सूर्य नमस्कार —- –

जर आपल्याला योगा येत नसेल, तर आपण सूर्यनमस्कारा सारखे मूलभूत योगासनापासून सुरुवात करू शकता. सूर्य नमस्कार केल्याने शरीराचे सारे अवयव हे ताणले जाऊ शकतात. त्यामुळे सगळ्या भागांचा व्यायाम हा होऊ शकतो.

प्राणायाम करा —–

या शिवाय प्राणायाम करणे देखील चांगले पर्याय आहे. या मध्ये दीर्घ श्वासोच्छ्वास करावा लागतो. ज्या मुळे आपली श्वसन प्रणाली चांगली राहते.

पायऱ्या वापरून चढ उतार करा —-

घराच्या बाहेर न जाता जर तुम्हाला व्यायाम करायचा असेल तर तुम्ही जिन्याच्या पायऱ्यांच्या साह्याने चढ उतार करू शकता. त्यामुळे पायांचे स्नायू हे बळकट राहण्यास मदत होऊ शकते.

दोर उद्या घ्या —

दोर उद्या घेण्यासाठी जास्त प्रमाणात जागा हि लागत नाही अश्या वेळी तुम्ही घरातूनच दोर उड्यांचा वापर करत आपले शरीर हे बळकट ठेवू शकता.

सतत कामात व्यस्त राहा —

आपल्या दररोज च्या दैन्यंदिन कामामध्ये थोडाआराम करून आपल्या कामाचे स्वरूप ठरवून कामात व्यस्त राहा . त्याने सुद्धा मेंदूला चालना मिळते.