पिझ्झा ,बर्गर जर आवडीने खात असाल तर ….
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या दररोज च्या जीवनात खूप बदल झाले आहेत. आजकाल लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत सगळ्यांना जंक फूड खायला जास्त आवडते. पिझ्झा , बर्गर या तर त्यांचे आवडीचे पदार्थ झाले आहेत. त्यामुळे लोकांच्या खाण्यात घरगुती पदार्थांऐवजी बाहेरच्या पदार्थांचा वापर हा जास्त प्रमाणात केला जातो. पण लहान मुलांना बर्गर , पिझ्झा खाण्याचे आवडत असेल तर मात्र ते त्याच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही.
आपण ज्या पद्धतीचा आहार आपल्या दररोज च्या दिनक्रमात ठेवत असतो. त्या पद्धतीने आपली प्रतिकार शक्ती वाढते किंवा कमी होते. त्यामुळे भात , पोळी याची सर कोणत्याच पदार्थाना येत नाही . बर्गर आणि पिझ्झा याचे साईट इफेक्ट खूप सारे आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात … साधारणपणे आपल्या शरीरासाठी प्रोटेस्ट फूड हे अजिबात चांगले नसते. तसेच आपल्या आरोग्याला अल्ट्रा प्रोटेस्ट आहाराचा सुद्धा आपल्या शरीरावर खूप वाईट परिणाम जाणवायला सुरुवात होते. अल्ट्रा प्रोटेस्ट फूड म्हणजे पिझ्झा , बर्गर आणि जंक फूड यांचा असलेला समावेश आहे.
अमेरिकन जर्नल मध्ये समाविष्ट केलेल्या पत्रानुसार , पिझ्झा , बर्गर हे जास्त काळ टिकले जावे म्हणून त्याच्यामध्ये साखर आणि केमिकल चा वापर हा जास्त प्रमाणात केला जातो. त्यामुळे हृदयाच्या आजारांचे प्रमाण आणि धोका हा जास्त प्रमाणात वाढू शकतो. आहारात योग्य पदार्थांचा समावेश नसल्याने अकाली मृत्यूचे प्रमाण हे जास्त असते. एका संशोधनातून असे आढळले आहे कि , ज्या लोकांच्या आहारात अल्ट्रा प्रोटेस्ट पदार्थांचा समावेश असल्याने आपल्या शरीरातील कॅलरीज चे प्रमाण वाढले जाते . त्यामुळे लोकांना हृदयाचे झटके यायला सुरुवात होते.
आजकाल जे जंक फूड तयार होत आहे . त्यामध्ये अनेक वेळा असे निष्कर्ष आले आहेत कि त्यामध्ये मिठाचे प्रमाण हे फार जास्त असते. त्या पदार्थांमध्ये केमिकल चा वापर हा जास्त प्रमाणात करतात त्यामुळे वजन वाढण्याची सुद्धा दाट शक्यता असते. चिप्स मधील असलेले साइड इफेक्ट हे जास्त प्रमाणात जाणवायला लागले आहेत. त्यामुळे चिप्स चा सुद्धा वापर हा जास्त न करता कमी प्रमाणात ज केला गेला पाहिजे.