Nasal hair removal can be harmful
|

नाकातील केस काढणे ठरू शकते हानिकारक

हॅलो आरोग्य  ऑनलाईन । अनेक वेळा लोकांना आपल्या नाकातील केस काढताना तुम्ही पहिले असेल , त्यामुळे केस का काढले जाते याची उत्सुकता हि अधिकच असते. सतत जर एखाद्याला नाकातील केस नकळत पणे तोडण्याची सवय असेल तर मात्र हि सवय आपल्याला जीवघेणी ठरू शकते, केस कापणे आणि केस तोडणे यामध्ये खूप काही प्रमाणात फरक आहे. केस तोडण्याच्या जी सवय आहे ती लगेच बंद केली गेली पाहिजे. त्यामुळे खूप जास्त प्रमाणत त्रास हा होऊ शकतो.

आपल्या नाकात असलेले केस हे आपल्या शरीराचे रक्षण करतात. हवेत असलेल्या धुळीपासून , प्रदूषणापासून , छोटे छोटे असलेलं धूलिकण हे आपल्या शरीरात पोहचले गेले नाही पाहिजते त्यासाठी नाकातील केस हे प्रभावीपणे काम करतात. जर ऑक्सिजन आपल्या शरीरात नाकावाटे घेतला जातो. त्याच वेळी हवेतील धूलिकण सुद्धा शरीरात प्रवेश करू शकतात. त्यामुळे ते दूर राहण्यासाठी नाकातील केस हे उत्तम आहेत.

आपल्या शरीरात असलेले फुफुस हे फिल्टर सारखे काम करते. जे घटक शरीराला अपायकारक आहेत ते दूर करण्यासाठी फुफुस हे महत्वाची भूमिका बजावते. नाकामध्ये असलेल्या रक्तवाहिन्या या मेंदूपर्यंत रक्त पुरवण्याचे काम करते. चुकून कधी आपल्या नाकातील केस जर तुटला तर नाकाच्या भागात छिद्र पडू शकतात. त्यामुळे खूप जास्त प्रमाणत रक्त हे बाहेर येऊ शकते. त्यामुळे गंभीर संसर्ग हा होऊ शकतो. त्याच्यामधून रक्ताचे प्रमाणं सुद्धा खूप जास्त प्रमाणात जाऊ शकते. त्यामुळे कदाचित कोणाचा पण मृत्यू हा होऊ शकतो. त्यामुळे नाकातील केस तोडताना किंवा उपटताना खूप विचार हा केला जावा.