आहारात काय आणि किती प्रमाणात घ्यावे ?
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या आहारात योग्य पदार्थांचा समावेश असणे गरजेचे आहे. पदार्थ जे पौष्टिक असतील तर आपल्याला कोणत्याही आजाराला समोरे जावे लागणार नाही. असा कोणताच आजार नाही कि तो आहाराच्या माध्यमातून बरा होणार नाही. परंतु बऱ्याच वेळा आपल्याला माहित नसते कि आपल्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश केला जावा . आणि तो किती प्रमाणात असला पाहिजे. त्याबद्धल आपण जाणून घेऊया …
आहार योग्य वेळी योग्य प्रमाणात व नियमातच घ्यावा म्हणजे खाल्लेले अन्न आपणास पोषण देईल. त्यासाठी कोणते नियम आहेत आणि ते कश्या पद्धतीने वापरले गेले पाहिजेत याची माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात .
आयुर्वेदातील आहारीय नियम—-
नियम १ —
आपल्या पोटाचे चार भाग करावेत . त्यातील दोन भाग हे आहारासाठी ठेवावेत , एक भाग हा पाण्यासाठी ठेवावा आणि उर्वरित एक भाग हा वायुभ्रमणासाठी रिकामा ठेवावा, त्यामुळे आहार हा सुयोग्यरीत्या पचविला जातो . आहार हा योग्य रीतीने पचला , तरच त्यातील पोषकांश शरीराला लाभतात आणि स्वास्थ्य टिकून राहते .
नियम २ —
सकाळी उठल्याबरोबर अर्धा ते एक ग्लास गरम पाण्यात एक लिंबू पिळून प्यावे . लिंबाचा रस हा थेट आपल्या पचनशक्तीवर कार्य करतो आणि जुनाट पित्त , तसेच मलबद्धता इत्यादी पचनसंस्थेशी संबंधित तक्रारी कमी करतो.
नियम ३ —-
जेवणाआधी थोडे पाणी प्यावे आणि जेवणाच्या मध्ये मध्ये काही घोट पाण्याचे प्यावेत . त्यामुळे आहार हा सुयोग्य रीतीने पचविला जातो.
नियम ४ —
कोणतेही फळ हे जेवणाच्या अगदी अगोदर किंवा नंतर घेऊ नये . अस वारंवार केल्यास मळमळणे , वा छातीत जळजळणे सुरू होते , तसेच फळांमधील पोषक तत्वे योग्य प्रमाणात शोषिले जात नाही.
नियम ५ —-
अतिशय घाईघाईने अथवा अतिशय हळू जेवू नये . पचनसंस्थेवर विपरीत प्रभाव पडतो .
नियम ६ —
दुपारी जेवणानंतर लगेचच झोपू नये . असे वारंवार केले गेल्यास अवाजवी स्थूलता वाढते आणि पचनही बिघडते .
नियम ७ —
दुपारचे जेवण हे दोन घास जास्त असले तरी चालेल , मात्र रात्रीचे जेवण हे कमी असावे आणि सूर्यास्तापूर्वी करावे . रात्री खूप उशिरा जेवल्याने पचनप्रक्रिया मंदावते .
नियम ८ —
आहार हा ताजा बनवलेला असावा . फ्रिजमधील थंड नसावा . तसेच फ्रिजमधील पाणी आणि बर्फाने शरीरातील उष्णता वाढते .
नियम ९ —
पहिला सेवन केलेला आहार जोपर्यंत पचत नाही , म्हणजेच कडकडून भूक लागत नाही तोवर पुढील आहार घेऊ नये . असे न केल्याने पचनाच्या तक्रारी सुरू होऊन इतर आजारांनादेखील कारणीभूत ठरू शकते.
नियम १०—
प्रत्येक जेवणानंतर अर्धी वाटी ताक प्यावे . त्यामुळे पचनशक्ती चांगली राहते आणि खाई खाई होत नाही .