वजन कमी करा आणि राहा फिट
हॅलो आरोग्य ऑनलाईन । वजन जर वाढले तर मात्र आपल्याला कमी करणे फार अवघड होत जाते. वाढलेले वजन हे नियंत्रित करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. त्यासाठी वजन हे जास्त वाढू नये म्हणून काय प्रयत्न केले गेले पाहिजेत. त्यासाठी काय काय घरगुती उपाय करू शकता याची माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात …
ओवा-जिऱ्याच्या काढ्याने ही वाढते वजन नियंत्रित कर शकता.ओव्यामध्ये एक प्रकारचे तेल असते. ज्याला थायमॉल असे म्हणतात. यामुळे पचनशक्ती मजबूत होते.थायमॉल ऑईल पोटातील निष्क्रिय फॅटला उर्जा देते. यामुळे कमी वेळात अधिक कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.जिऱ्यामधील एन्झाईम्स शुगर, फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स कमी करण्यास मदत करतात. यासोबतच आतडेही निरोगी ठेवतात.या काढ्याच्या सेवनाने एका महिन्यात दोन किलो वजन कमी होण्यास मदत होते. आल्याच्या रसात काही प्रमाणात मध घालून सुद्धा हा ते प्या. आल्याच्या रसात दोन चमचे मध घालून प्या. आले आणि मध शरीराची चयापचय वाढवून जादा चरबी जाळण्याचे काम करतात.
अश्वगंधाची दोन चार पाने घेऊन पेस्ट बनवा. सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्यात उकळून प्या. अश्वगंधा तणावामुळे लठ्ठपणास मदत करते. झोपायच्या वेळीदोन वेलची खाल्ल्याने व वरती गरम पाणी घेतल्यास वजन कमी होण्यास मदत होते. वेलची पोटात साठलेली चरबी कमी करते आणि कॉर्टिसॉलची पातळी देखील नियंत्रित करते. बडीशेप सुद्धा आहारात काही प्रमाणात असले पाहिजे. त्याने कॅलरीज कमी होण्यास मदत होऊ शकते.पुदिन्याच्या पानांचा रस चमचाभर कपभर कोमट पाण्यात घाला. खाल्ल्यानंतर अर्ध्या तासाने ते प्या. हे पचन करण्यास मदत करते आणि चयापचय क्रिया वाढवून वजन कमी करण्यास मदत करते. दररोज काही ना काही प्रमाणात आपल्या शरीराची मालिश करा.