आरोग्यासाठी कश्या पद्धतीने घ्यावी झोप ?
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या शरीराला योग्य प्रकारचा आहार घेणे गरजेचे असते. आहार जर योग्य प्रकारचा असला तरी आपल्या शरीराला पुरेशी झोप मिळणे गरजेचे असते. झोप जर पुरेशी झाली नाही तर मात्र आपल्याला ताणतणावांपासून दूर राहता येत नाही. दिवसभराचे काम केले कि त्यानंतर मात्र आपल्याला योग्य वेळेत झोप घेणे गरजेचे असते. झोप जर पूर्ण झाली नाही तर मात्र आपल्याला अनेक आजारांचा सामना हा जास्त प्रमाणात करावा लागतो.
शरीर जास्त थकले असेल तर त्यावेळी तुम्हाला झोपेची गरज हि जास्त असते. विश्रांतीच्या काळात विश्रांतीच केली गेली पाहिजे. झोप हि आपल्या शरीराला विश्रांती देऊन आपल्या शरीराचे पोषण करत असते. रोजच्या रोजच्या दिनचर्येचा नैसर्गिक आणि आवश्यक भाग असलेली ही निद्रा आपल्याला ऊर्जा देते, जी निरामय आरोग्यासाठी अत्यंत गरजेची आहे. योग्य प्रकारे गाढ झोप घेतल्याने आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात ऊर्जा मिळते. ज्यामुळे आपणास ताजेतवाने, प्रसन्न वाटते. कोणतेही काम करण्याचे असेल तर त्यावेळी खूप प्रसन्न वाटते.
झोपेचे प्रमाण जास्त झाले असेल अश्या वेळी आपल्याला सुस्ती यायला सुरुवात होते. ते आपल्या आरोग्याला अजिबात योग्य नसते. अशक्तपणा, सुस्ती, अल्पायुष्य अशा व्याधी निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. झोप जर वेळेत आणि हवी ठेवढी झाली नाही तर मात्र आपल्याला त्रास हा जास्त प्रमाणात जाणवायला सुरुवात होते. आपल्या शरीराला कमीतकमी प्रमाणात ५ ते ६ तास झोप घेणे आवश्यक आहे. लहान मुलांना कमीत कमी १२ तास झोप घेणे गरजेचे आहे. साधारण तुम्ही ७ ते ८ तास झोप घेणे गरजेचे आहे.